जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
विषय : - भाषा - आराखडा
वेळ - ३० मिनिटे 
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आजच्या भागात भाषा विषय , त्याचा आराखडा व बदल याविषयी माहिती देणारा हा महत्त्वपूर्ण भाग .
                            सन २०१९ मध्ये  जवाहर नवोदय विद्यालय  प्रवेश परीक्षा  आराखड्यात बदल करण्यात आला . यानुसार सन २०१९ व २०२०  साली घेण्यात आलेल्या परीक्षेत , भाषेच्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न क्रमांक ६१ ते ८० असे एकूण २० प्रश्न विचारण्यात आले होते . एकूण २५ देण्यात आले होते . यामधील सर्व प्रश्नाच्या अचूक उत्तरला  १.२५  देण्यात आला होता .
                    या वि भागात एकूण ४ उतारे देण्यात येतात . प्रत्येक उताऱ्यावर आधारित ५ प्रश्न विचारले जातात . या नुसार प्रश्न ६१ ते ८० असे २० प्रश्न देण्यात येतात .
                            प्रत्येक प्रश्नासाठी उत्तराचे Ⓐ Ⓑ Ⓒ Ⓓ असे  चार पर्याय दिलेले असतात . या चार पर्यायांपैकी अचूक उत्तराचा  पर्याय निवडून त्याचे वर्तुळ काळे करावे . जसे कि ⚫ असे रंगवावे .
➤  विद्यार्थ्यांनी  हे लक्षात ठेवावे 
- उतारे काळजीपूर्वक वाचा .
 - प्रत्येक उतारा हा सात ते आठ मिनिटात पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा .
 - उताऱ्यातील घटना , प्रसंग ,संवाद , व्यक्ती , पात्र इत्यादी गोष्टी समजून घ्याव्यात
 - उताऱ्यातील माहितीचा , घटनाक्रम समजून घ्यावा .अचूक व जलद उत्तरे देण्यास तुम्हाला फायदा होईल
 - एखादा प्रश्न समजत नसेल अथवा उत्तराबद्दल खात्री नसेल तर , उतारा पुन्हा वाचवा व योग्य उत्तर निवडावे .
 
हि माहिती उपयुक्त वाटल्यास ब्लोग पोस्ट SHARE करा . ब्लोग ला FOLLOW करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 जवाहर नवोदय विद्यालय  प्रवेश परीक्षा बाबत EDUTECH ONLINE YOUTUBE CHANNEL
वर मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे . 
तरी आपण खालील लिंकवर क्लिक  करावे . याचा महराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना नक्की फायदा होईल .
👇👇👇👇👇👇👇
याचे वेळा पत्रक खालीलप्रमाणे आहे .
| 
   वार
    | 
  
   विषय
    | 
  
   वेळ
    | 
 
| 
   सोमवार   | 
  
   मानसिक क्षमता चाचणी   | 
  
   30 मिनिटे  | 
 
| 
   मंगळवार   | 
  
   मानसिक क्षमता चाचणी  | 
  
   30 मिनिटे  | 
 
| 
   बुधवार
    | 
  
   अंक
  गणित   | 
  
   30 मिनिटे  | 
 
| 
   गुरुवार   | 
  
   अंक
  गणित   | 
  
   30 मिनिटे  | 
 
| 
   शुक्रवार   | 
  
   भाषा   | 
  
   30 मिनिटे  | 
 
| 
   शनिवार   | 
  
   भाषा   | 
  
   30 मिनिटे  | 
 
| 
   रविवार
    | 
  
   चाचणी
  online   | 
  
   30 मिनिटे  | 
 
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS