Header Ads Widget

PPF खाते कुणी उघडावे ? खाते खोलण्यासाठी आवश्यक पुरावे #PPF

        PPF खाते कुणी उघडावे ? 


  • प्रत्येक भारतीय नागरिकाला पीपीएफ खाते उघडता येते. 
  • वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला हे खाते उघडता येते.
  •  एका नागरिकाला एकच पीपीएफ खाते उघडता येते.
  • अल्पवयीन मुलांच्या नावानेही पीपीएफ खाते उघडता येते. मात्र वार्षिक रक्कम भरण्याची १.५ लाख रुपयांची कमाल मर्यादा अल्पवयीन खातेदार व त्याचा पालक यांच्यासाठी संयुक्तरीत्या लागू होते.
  • अनिवासी भारतीयांना पीपीएफ खाते उघडता येत नाही.
  • हिंदू अविभक्त कुटुंबाला पीपीएफ खाते उघडता येत नाही. मात्र १३ मे, २००५पूर्वी हिंदू अविभक्त कुटुंबांनी पीपीएप खाती उघडली असतील तर ती खाती चालू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे.


खाते खोलण्यासाठी आवश्यक पुरावे  कागदपत्रे


  • वाहनचालक  परवाना, मतदार कार्ड, रेशन कार्ड,पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड,  सही केलेला चेक आदी
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • नामांकनासह पूर्ण भरलेला खाते उघडण्याचा अर्ज
  • अल्पवयीन मुलाच्या नावे खाते उघडायचे झाल्यास त्याच्या वयाचा दाखला.

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1