Header Ads Widget

Electrol Search मतदार यादीत नाव कसे शोधावे

मतदार यादीत नाव शोधणे साठी भेट द्या: https://electoralsearch.eci.gov.in/

आपल्याकडे असलेल्या मतदान कार्ड वरील EPIC क्रमांक नोंदवा राज्य निवडा कॅपच्या कोड टाका व सर्च बटन वर क्लिक करा



Epic नंबर माहित नसेल तर Search by Details वर क्लिक करा पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये स्वतःचे नाव वडीलाचे नाव जन्मतारीख किंवा वय जिल्हा विधानसभा क्षेत्र सर्व माहिती नोंदवा अथवा निवडा शेवटी कॅपच्या कोड नोंदवून सर्च बटन वर क्लिक करा.



वरील पद्धतीने ही नाही शोधता आले तर जर तुमचा मोबाईल नंबर इपिक सोबत अपडेट केलेला असेल तर मोबाईल नंबर द्वारे देखील आपल्याला आपले नाव मतदार यादीत शोधता येईल. सर्च माय मोबाईल वर क्लिक करून पुढील प्रमाणे ओपन होणाऱ्या विंडोमध्ये मोबाईल नंबर नोंदवा चर्चा करून टाका व सेंड ओटीपी वर क्लिक करून ओटीपी घेऊन सर्च बटन वर क्लिक करा.




तुम्हाला तुमच्या गावातील मतदार यादी डाऊनलोड करायचे असेल तर पुढील लिंक वर क्लिक करावे. 

 How Search Name Part Number EPIC Voter List With Voter HelplineLink Mobile App 



वरील प्रमाणे मोबाईल मध्ये किंवा कम्प्युटर मध्ये विंडो ओपन होईल त्यामध्ये आपले राज्य जिल्हा व विधानसभा मतदारसंघ निवडावा त्यानंतर भाषा निवडून कॅपच्या कोड त्या समोरील चौकटीत टाकावा त्याखाली आपल्याला त्या मतदारसंघातील विविध भागाच्या मतदार याद्या डाउनलोड करण्याचे ऑप्शन मिळेल त्यामधील आपल्या गावाचे नाव शोधा अनेक असतील तर आपला भाग क्रमांक शोधा व संपूर्ण मतदार यादी डाऊनलोड करून त्यामध्ये आपला अनुक्रमांक मतदान ओळखपत्र क्रमांक या सर्व गोष्टी मिळतील जेणेकरून आपल्याला मतदान कर्तव्य प्रमाणपत्र किंवा पोस्टल बॅलेट मिळण्यासाठी अर्ज करता येईल. 



वरील पद्धतीने आपल्याला जर आपले नाव शोधता आले नाही तर मोबाईल मध्ये पुढील लिंक वर टच करून वोटर हेल्पलाइन नावाचे अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen











त्यामधील इन्स्टॉल Install या निळ्या बटन वर क्लिक करा एप्लीकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करा आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल. 









आपण अगोदरच रजिस्टर केलेली असेल तर मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून लॉगिन करा किंवा नवीन युजर म्हणून रजिस्ट्रेशन करा किंवा स्किप लॉगिन वर क्लिक करा आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल. त्यामधील सर्च बारमध्ये क्लिक केल्यास









वरील विंडोमध्ये आपण आपले राज्य निवडून जर आपला मोबाईल नंबर या अगोदरच पोर्टलवर किंवा आपल्या मतदान ओळखपत्र सोबत जोडलेला असेल तर मोबाईल नंबर अचूक नोंदवून ओटीपी घेऊन लगेच आपल्याला आपल्या मतदान क्रमांक यादी भाग क्रमांक इत्यादी सर्व गोष्टी दिसून येतील जर आपला मोबाईल क्रमांक नोंदवलेला नसेल तर आपल्याला आपल्या नावाने देखील आपला मतदार क्रमांक यादी भाग क्रमांक इत्यादी सर्व गोष्टी शोधता येतात. 

त्यासाठी सर्च बाय डिटेल्स वर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होतात त्यामध्ये आपले नाव वडिलांचे नाव आडनाव वय जेंडर राज्य जिल्हा व विधानसभा मतदार संघ निवडून व अचूक नोंदवून सर्च बटन वर क्लिक केल्यानंतर आपल्या मतदार यादीतील क्रमांक भाग क्रमांक व इतर गोष्टी दिसतात. 




यामध्ये आपल्याला EPIC क्रमांक मतदार यादी भाग क्रमांक व मतदार यादीतील अनुक्रमांक जो आपल्याला मतदान कर्तव्य प्रमाणपत्र किंवा पोस्टल बॅलेट चा अर्ज देण्यासाठी आवश्यक आहे. 



जर आपल्याकडे मतदान ओळखपत्र उपलब्ध असेल व त्यावर सुस्पष्ट मतदान ओळखपत्र क्रमांक दिसत असेल तर SEARCH BY EPIC हा पर्याय वापरून देखील लगेच माहिती शोधता येईल त्यासाठी सर्च बाय इपिक वर क्लिक करा. पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामधील एंटर युअर एपिक नंबर या रकान्यात तुमचा अचूक ओळखपत्र क्रमांक नोंदवा व त्याखालील सर्च बटन वर क्लिक करा. 






अगदी काही सेकंदातच तुमच्या मतदार यादीतील तुमचे नाव मतदार यादी भाग क्रमांक मतदार यादीतील अनुक्रमांक इत्यादी सर्व माहिती तुम्हाला मिळेल. 



माहिती आवडल्यास नक्की इतरांना इतरांना शेअर करा! धन्यवाद! 
Follow करायला  विसरू नका 


Follow on Instagram 🙏


Post a Comment

0 Comments

APPAR INSTRUCTION LETTER PDF DOWNLOAD

LEARN EXCEL PAGE SETUP - 1