जागतिक महिला दिनी जेष्ठ महिलांचा सन्मान*
जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा.
तलासरी
8 मार्च 2024
०८ मार्च अर्थात जागतिक महिला दिन. स्त्रियांवर होत असलेले अत्याचार, अन्याय दूर व्हावे, सर्वच क्षेत्रात महिलांचा विकास व्हावा यासाठी आज जगभर महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
तलासरी तालुक्यातील इंडिया कॉलनी वेवजी येथे जागतिक महिला दिनाच्या औचित्यवर इंडिया कॉलनीतील जेष्ठ महिला, कर्तृत्ववान महिला व मुलींचा सत्कार करण्यायात आला.
जागतिक महिला दिनाच्या निम्मिताने जेष्ठ महिलांचा शाल, पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. विद्या शिंदे यांचा देखील सत्कार वैशाली पटेल, पन्नाबेन, सरला गायकवाड,कृतिका पांचाळ यांनी केला.
कमलाबेन पंचाळ (73वर्षे ), ज्योत्स्ना बाणे ( 71 वर्षे ), मयुरी पांचाळ (61 वर्षे ), लता निकम (69 वर्षे ), विद्या विवतकर (65 वर्षे ), इंदिरा पाटील (64 वर्षे ), आनंदी झा (60 वर्षे ), उषा ठाकूर (60 वर्षे ) यांचा सन्मान शाल व पुष्प देऊन करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात धनंजय गायकवाड यांच्या जिजाऊ वंदना गायनाने करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण ननवरे यांनी केले. सूत्रसंचालन मेशवा पटेल, खुशबू सिंग ह्यांनी केले. या कार्यक्रमाला 100 हुन अधिक महिलांचा सन्मान करण्यात आला.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी विविध उपक्रम घेण्यात आले. फुगे फोडणे, रस्सी खेच,संगीत खुर्ची, डोज बॉल या खेळाचे आयोजन रुपाली देसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्याचबरोबर शालेय विद्यार्थीनीचे भाषण घेण्यात आले. शिवव्याख्याती कु ईश्वरी ननवरे हिने महिला दिनानिमित्त प्रेरणादायी चारोळ्या सादर केल्या.उज्ज्वला पांचाळ यांनी महिला दिनानिमित्त कविता सादर केली.सविता बोरसा, संयोगिता गायकवाड, पल्लवी ननवरे यांनी संगीत खुर्ची प्रकारात बाजी मारली. 1 ली ते 5 वी च्या सर्व मुलीना ड्रॉईंग किट देऊन सिंगरिया यांनी आनंद द्विगुणित केला.सदरील कार्यक्रम अत्यंत उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात घेण्यात आला. या करायक्रमात शेकडो महिलांनी, मुलींनी सहभाग नोंदविला.या कार्यक्रमसाठी अल्पपोहार रुपाली देसले यांनी उपलब्ध करून दिला.
आजचा कार्यक्रम यादव इंगळे, डॉ मोहन गायकवाड, डॉ नेताजी पाटील, मंचक साबणे, अशोक थोरात, धनंजय गायकवाड, विलास पाटील, वैशाली पटेल, खुशबू सिंग, मेशवा पटेल, उज्ज्वला पांचाळ, रुपाली देसले, पल्लवी ननवरे, रुपाली नागृत, प्रणिता गिरी, कृतिका पांचाळ यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. हा कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे धन्यवाद.
यांचा देखील सन्मान करण्यात आला
1) Ujwala Hagovind panchal
2) Kamlaben A. Panchal
3) Jyotsna Bane
4) Jyoti champanerkar
5) Rupali Desale
6) yeeta yadav
7) vidya shinde
8) Sanyogita gayakvad
9) Rupal Nagrut
(o) výšwada kamble
Malini Patel
12) Pannaben Patel
13) Kinjal Patel
14) Radhika more
15 Laxmi Panchal
(6) Pramila khotare
18) Sarita Borsa
19) vaishali Patel
20) Meshva Patel
21) Lata nikam
22) Vidya vivatkar
23) Pallavi nanavare
24) Kamal Bhagde
25) Sarika Pawar
20) Minal Salale
27) Mayuri Panchal
28 Indira Patil
24) Harsha Patil
30) Kratika Panchal,
31) Sarla gayakwad
32) कोमल baisane
33) पाटील
Watch Videos
"जागर विद्येचा, सन्मान नारी शक्तीचा" अंतर्गत जागतिक महिला दिनाचे दुसरे वर्ष असून या निम्मिताने जेष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला, याचा विशेष आनंद आहे. - लक्ष्मण ननवरे
" आज जागतिक महिला दिनानिमित्त कॉलनीतील जेष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला.त्याबद्दल खूप आनंद व समाधान वाटले. कृतर्थ वाटले. लक्ष्मण ननवरे, यादव इंगळे, अशोक थोरात,वैशाली पटेल व सर्व आयोजक टीमचे आभार.
- मयुरी पांचाळ, जेष्ठ महिला "
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS