HEADER

शिष्यवृत्ती परीक्षा 2026 | केंद्रसंचालक, पर्यवेक्षक नियम व Custody माहिती

 

शिष्यवृत्ती परीक्षा 2026 : केंद्रसंचालक, पर्यवेक्षक नियुक्ती व Custody ठिकाण नियम

🎯 शिष्यवृत्ती परीक्षा 2026 : केंद्रसंचालक, पर्यवेक्षक नियुक्ती व Custody ठिकाण नियम



पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, शिपाई नियुक्ती तसेच गोपनीय साहित्याच्या Custody ठिकाणाबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.


🏫 जिल्हा व तालुका समन्वयक

  • जिल्हा समन्वयक : शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षण निरीक्षक
  • तालुका समन्वयक : गटशिक्षणाधिकारी / वॉर्ड ऑफिसर

👨‍🏫 (अ) केंद्रसंचालक नियुक्ती नियम

  • केंद्रसंचालक नियुक्तीची अंतिम तारीख : 30 जानेवारी 2026
  • विश्वासू, प्रामाणिक व जबाबदार अधिकारी नियुक्त करावेत.
  • 31 जुलै 2026 पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती करू नये.
  • केंद्रप्रमुख / मुख्याध्यापक / पदवीधर शिक्षक उपलब्ध नसल्यास सेवाजेष्ठ उपशिक्षक नियुक्त करता येईल.
  • एकदा नियुक्त झालेल्या केंद्रसंचालकात शक्यतो बदल करू नये.

👥 (ब) उपकेंद्रसंचालक

  • 300 पेक्षा अधिक परीक्षार्थी असतील तर 1 उपकेंद्रसंचालक आवश्यक.
  • पदवीधर शिक्षक किंवा अनुभवी उपशिक्षक नियुक्त करावा.

📝 (क) पर्यवेक्षक नियुक्ती नियम

  • प्रत्येक 24 परीक्षार्थ्यांमागे 1 पर्यवेक्षक.
  • इ. 9 वी ते 12 वी शिक्षकांना प्राधान्य.
  • एकाच शाळेतील व्यक्तीची नियुक्ती करू नये.
  • शिष्यवृत्ती शिकवणारे शिक्षक पर्यवेक्षक म्हणून नेमू नयेत.

➕ अतिरिक्त पर्यवेक्षक

परीक्षार्थी संख्या अतिरिक्त पर्यवेक्षक
101 ते 300 1
301 ते 500 2
501 पेक्षा अधिक 3

अतिरिक्त पर्यवेक्षकांचा उपयोग प्रश्नपत्रिका वाटप, उत्तरपत्रिका संकलन व पर्यायी व्यवस्थेसाठी करता येईल.


🧹 (ड) शिपाई / परिचर नियुक्ती

  • प्रत्येक 100 विद्यार्थ्यांमागे 1 शिपाई.
  • 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसाठी कमाल 7 शिपाई मंजूर.
  • स्वच्छता, पाणी व्यवस्था व इतर कामांसाठी उपयोग.

🔐 (ई) Custody (परिरक्षण) ठिकाण

  • गोपनीय साहित्य जिल्ह्यात 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत पोहोचेल.
  • Custody ठिकाण निश्चिती अंतिम तारीख : 19 जानेवारी 2026
  • सुरक्षित व संरक्षित जागेची निवड करावी.
  • संबंधित अधिकाऱ्याचे नाव व संपर्क माहिती सादर करावी.

⚠️ महत्त्वाच्या सूचना

  • नातेवाईक परीक्षा देत असतील तर त्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करू नये.
  • सर्व कर्मचाऱ्यांकडून लेखी हमीपत्र घ्यावे.

📌 अधिक शिष्यवृत्ती अपडेट्ससाठी estudi.in ला नियमित भेट द्या.

Post a Comment

0 Comments

शिष्यवृत्ती परीक्षा 2026 | केंद्रसंचालक, पर्यवेक्षक नियम व Custody माहिती