Primary schools in Maharashtra reopens
राज्यातील (Maharashtra) शहरी भागात 8 ते 12वी आणि ग्रामीण भागात पाचवी ते 12वीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यानंतर आता राज्यात इयत्ता 1ली पहिलीपासूनच्या शाळा सुरू (School reopen) होण्याची शक्यता आहे. पहिलीपासूनचे वर्ग सुरू कऱण्यास शालेय शिक्षण विभाग अनुकूल असल्याची माहिती समोर आली असून या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची मान्यता मिळाल्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं वृत्त आहे. याबाबतीत अंतिम निर्णय महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री ठाकरे घेणार आहेत .( Primary schools In Maharashtra Reopens soon)
प्राप्त माहितीनुसार, प्राथमिक शाळा सुरू कऱण्याच्या संदर्भात मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. या बैठकीत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड Varsha Gaikwad , तसेच शिक्षण विभागाचे सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर शालेय शिक्षण विभाग प्राथमिक शाळा सुरू करण्यास अनुकूल असल्याचं बोललं जात आहे.
येत्या पंधरा दिवसांत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो . तसेच पुढील महिन्यात अथवा जानेवारी महिन्याच्या शेवटी शाळा पुन्हा सुरू करण्यात येतील अशी चर्चा आहे .
#CM THAKRE , #PRIMARY SCHOOL, #VARSHATAI GAIKWAD #AJIT PAWAR
हे ही वाचा
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS