सर्व प्रथम गुगल प्ले स्टोअर मधून
महाऊस नोंदणी ( Maha Us Nondani )
नावाचे अँप्लिकेशन डाउनलोड करावे
अँप डाउनलोड होताच ऊस क्षेत्राची माहिती भरा हे बटन दाबावे.
पुढे ऊस क्षेत्र नोंद करावयाच्या शेतकऱ्याची माहिती असा भाग दिसेल .
त्यामध्ये मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, पूर्ण नाव टाकावे . पुढे बटन दाबावे .
त्यानंतर ऊस लागवडीची माहिती असा भाग दिसु लागेल.
तेथे लागवडीचा प्रकार , उसाची जात,लागवड तारीख नमूद करावी . ऊस क्षेत्र गुंठ्यांत भरावे .त्यांनतर पुढे असे बटन दाबावे .
ऊस पीक उपलब्ध माहिती कोणत्या कारखान्याला कळवू इच्छिता असे दिसून येईल .
त्यामध्ये कमीत कमी एक व जास्तीत जास्त तीन कारखान्याची नावे टाकता येतील .
ती टाकून पुढे हे बटन दाबावे .
ही नोंद पूर्ण होताच शेतकऱ्याला
आपणास धन्यवाद असा संदेश दिसू लागेल .
त्यांनंतर निवडलेले कारखाने सम्पर्क करतील .
यानंतर साखर कारखान्यातील आपली ऊस नोंदणी पहा वर क्लिक करा . नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक टाका . पुढे हे बटन दाबा .
ही नोंदणी होताच ऍप मध्ये केलेली नोंद , कारखान्याने स्वीकारलेली नोंद , आणि कारखान्याने नाकारलेली नोंद
ही माहिती पाहू शकतो
ऍप डाउनलोड लिंक खाली दिलेली आहे .
किंवा
मोबाईल मधून खालील qr कोड स्कॅन करा
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS