HEADER

SUMMATIVE TEST INSTRUCTION

सर्वसाधारण सूचनाः

१) संकलित मूल्यमापन- २ साठी परीक्षांचे आयोजन शाळा स्तरावरुन करण्यात येईल तथापि त्यांसाठी यासोबत दिलेल्या वेळापत्रकाचा वापर करण्यात यावा.

२) शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांना PAT अंतर्गत इयत्ता ३ री ते ९ वी साठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांसाठी संकलित मूल्यमापन- २ च्या प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयाकडून पुरविण्यात येतील. इतर व्यवस्थापनाच्या शाळांना सर्व प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करावयाच्या आहेत.

३) इयत्ता १ ली व २ री साठी सर्व विषयांच्या व इ. ३ री ते ९ वी अन्य विषयांच्या संकलित चाचणी-२/लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर विकसित करून प्रचलित पद्धतीनुसार मूल्यमापन करावे.

४१ इयत्ता ९ वी साठी PAT शिवाय अन्य विषयांसाठी वेळापत्रक यासोबत देण्यात आलेले नाही ते शाळास्तरावरून ठरविण्यात यावे.

५) वेळापत्रकात नमूद न केलेल्या (कलाशिक्षण, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, इत्यादी) श्रेणी विषयांच्या मूल्यमापनाचे नियोजन शाळास्तरावर करण्यात यावे.

६) शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांना PAT अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांचा वापर करूनच त्या विषयाची संकलित चाचणी २ घ्यावयाची आहे, इतर विषयांसाठी शाळास्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून संकलित चाचणी-२ घेण्यात यावी.

७) तथापि, इयत्ता ५ वी व ८ वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा शासन निर्णय दि. ०७/१२/२०२३ मधील तरतूदीनुसार स्वतंत्रपणे शाळांनी सर्व विषयांच्या प्रश्रपत्रिका स्वतः तयार करून घ्यावयाची आहे. PAT-३ अंतर्गत दिलेल्या प्रश्नपत्रिका वार्षिक परीक्षा म्हणून वापरता येणार नाही.

टीप- इ. ५ वी व इ.८ वी मधील विद्यार्थ्यांना प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांसाठी दोन प्रश्नपत्रिका सोडावाव्या लागतील. त्यानुसार नियोजन करावे. इयत्ता पाचवी व आठवी वगळता अन्य इयत्तांकरिता कोणत्याही विषयांची दुबार परीक्षा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

८) शाळेच्या स्थानिक वेळेनुसार (सकाळ सत्र / दुपार सत्र) परीक्षेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य शाळांना राहील. तथापि यासोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार त्या विषयाची परीक्षा त्याच तारखेस हईल याची

दक्षता घ्यावी. २) तोंडी/प्रात्यक्षिक परीक्षा त्या-त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर घेण्यात यावी. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसन्या दिवशी अथवा उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.

१०) संकलित चाचणी- २ च्या कालावधीत शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी त्या विषयाच्या परीक्षेच्या दिवशी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी.

११) राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांचा निकाल महाराष्ट्र दिन ध्वजारोहनानंतर दि. ०१/०५/२०२५ रोजी जाहीर करण्यात यावा. याचबरोबर ०२ मे २०२५ पासून सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी सुरु होईल.

१२) सदर सूचना राज्यमंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळाच्या शाळांना लागू असणार नाहीत.

संकलित चाचणी- २ आयोजनाची जबाबदारी जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक यांची असेल. त्यांनी सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी.

उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेत सर्व नमूद इयत्तांची चाचणी होईल याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल, तथापि, अपवादात्मक किंवा स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन

काही बदल करायचे असल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांची परवानगी घेवूनच वेळापत्रकात बदल करावा.

वरीलप्रमाणे सूचना शाळा व पर्यवेक्षकीय यंत्रणा यांचेसाठी निर्गमित करण्याबात कार्यवाहीसाठी आपले स्तरावरून आदेश व्हावेत ही विनंती.

आपला

Post a Comment

0 Comments

Maharashtra SIR 2026 Revised Schedule | मतदार यादी SIR सुधारित वेळापत्रक | Final Voter List 4 November 2026*