HEADER

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे 'विशाखा-२०२४' पुरस्कार घोषित.. यादी पहा

 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे 'विशाखा-२०२४' पुरस्कार घोषित

विशाखा पुरस्कार @2024





यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसमाग्रज अध्यासनाच्या वतीने दरवर्षी 'विशाखा काव्य पुरस्कार' दिला जातो. हा पुरस्कार प्रथमतःच प्रकाशित काव्यसंग्रहाला दिला जातो. सन २०२४ चा प्रथम पुरस्कार 'तुझं शहर हजारो मैलांवर' या सुनिता डागा (वडगाव शेरी, पुणे) यांच्या काव्यसंग्रहाला, द्वितीय पुरस्कार 'माती मागतेय पेनकिलर' या सागर जाधव जोपुळकर यांच्या काव्यसंग्रहाला तर तृतीय पुरस्कार 'दंगल होतेच कशी?' या गौतम राजू ढोके यांच्या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे.


२०२४ साठी एकूण २७ काव्यसंग्रह प्राप्त झाले होते. प्राथमिक छाननी समितीने नऊ संग्रह निवडून दिले होते. अंतिम निवड समितीने या संग्रहांमधून वरीलप्रमाणे संग्रहांची पुरस्कारांसाठी निवड केली आहे. मा. कुलगुरु प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने संगठित समित्यांनी ही द्विस्तरीय निवडप्रक्रिया पार पाडली. या निवडप्रक्रियेचे समन्वयक म्हणून कुसुमाग्रज अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप धोंडगे यांनी काम पहिले. तर अंतिम निवड समिती सदस्य म्हणून डॉ. नंदकुमार मोरे (कोल्हापूर), श्री. प्रवीण दशरथ बांदेकर (सावंतवाडी), डॉ. प्रज्ञा दया पवार (ठाणे) यांनी काम पहिले.


या पुरस्कारार्थांचे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव श्री. दिलीप भरड यांनी अभिनंदन केले आहे. विशाखा काव्य पुरस्कार २०२४ तसेच मागील घोषित झालेल्या विशाखा पुरस्कारांचा एकत्रित वितरण समारंभ विद्यापीठाच्या एखाद्या विभागीय केंद्राच्या ठिकाणी लवकरच केला जाणार आहे.


👉 महागाई भत्ता वाढला...





Post a Comment

0 Comments

Roman Numbers Rules