HEADER

जिल्हा परिषद पालघर येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न

 📍 जिल्हा परिषद पालघर येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न



   दिनांक 5 जून 2026 रोजी जिल्हा परिषद पालघर येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर  उत्साहात पार पडले.

       या शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद पालघर,महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटना,डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्ट तसेच जिल्हा रुग्णालय पालघर  यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

      या उपक्रमात जवळपास 150 अधिकारी व कर्मचारी यांनी आरोग्य तपासणी** करून घेतली, तर  50 रक्तदात्यांनी रक्तदान  करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला.

      या शिबिराचे संयोजन श्री. किशोर पाटील (राज्य सचिव, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

     यावेळी *श्री. राजेंद्र पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर) यांनी भेट देऊन स्वतः आरोग्य तपासणी करून घेतली व उपक्रमाचे कौतुक केले.

*कोटक लाइफ इन्शुरन्स** यांच्या महादृष्टी प्रकल्पांतर्गत

*डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्ट हॉस्पिटल, पालघर** व

जिल्हा परिषद कार्यालय, पालघर यांच्या सहकार्याने

मोफत आरोग्य तपासणी शिबिरात खालील सेवा देण्यात आल्या:

✔️ डोळ्यांची तपासणी व मोफत चष्मे

✔️ मधुमेह तपासणी

✔️ रक्तदाब तपासणी

✔️ हिमोग्लोबिन तपासणी

      या शिबिरामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून, समाजहितासाठी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित झाले.

"आरोग्य हीच खरी संपत्ती – चला, आरोग्यदायी समाज घडवूया!"





Health Check Up








Post a Comment

0 Comments

CTET 2026 Exam Date Out: 12 आणि 13 डिसेंबरला होणार CTET परीक्षा; CBSEची अधिकृत घोषणा