HEADER

लायन्स क्लब बोर्डीतर्फे गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

लायन्स क्लब बोर्डीतर्फे गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
बोर्डी, दि. २१ जुलै :
आज दिनांक २१ जुलै २०२६ रोजी लायन्स क्लब बोर्डी यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा वसा पाटीलपाडा तसेच जिल्हा परिषद केंद्र शाळा वसा आरशीपाडा येथील गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमासाठी लायन शशिकांत ईशी, लायन मंदाकिनी ईशी आणि लायन रमेश राऊत यांनी वह्यांचे योगदान दिले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.
या कार्यक्रमास लायन्स क्लब बोर्डीचे अध्यक्ष श्री. ओमप्रकाश सोनी, उपाध्यक्ष श्री. रमेश राऊत, खजिनदार लायन परेश काकरिया, लायन प्रशांत म्हात्रे,लायन लक्ष्मण ननवरे, लायन शशिकांत ईशी आणि लायन मंदाकिनी ईशी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी लायन्स क्लबच्या या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.
"सेवा हीच आमची ओळख" या ब्रीदवाक्याप्रमाणे लायन्स क्लब बोर्डी समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत असून भविष्यातही अशा शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.








Post a Comment

0 Comments

Maharashtra SIR 2026 Revised Schedule | मतदार यादी SIR सुधारित वेळापत्रक | Final Voter List 4 November 2026*