Header Ads Widget

जवाहर नवोदय परीक्षा 2021 इयत्ता 6वी महत्त्वाची अपडेट #JNV #EXAM,#6TH



15 मे रोजी पूर्वनियोजित सहावीची प्रवेश परीक्षा  2021 नवोदय विद्यालय घेणार नाही 
May 13, 2021

         जवाहर नवोदय विद्यालयात (Jawahar Navodaya Vidyalaya) इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा 15 मे 2021 च्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होणार नाही. मिझोराम, नागालॅंड आणि मेघालय वगळता देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मे महिन्याच्या मध्यात होणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी  प्रवेश परीक्षा (Entrance Exam) घेत असलेल्या नवोदय विद्यालय समितीने (NVS) ने navodaya.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केलेल्या अद्ययावत माहितीनुसार NVS वर्ग सहावीची प्रवेश परीक्षा 2021 ही प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. (Navodaya Vidyalaya will not held the pre-scheduled sixth entrance examination on May fifteen)
घोषणा नवीन परीक्षेच्या तारखेच्या 15 दिवस आधी केली जाईल नवोदय विद्यालय समितीने NVS वर्ग सहावीची प्रवेश 2021 चाचणी पुढे ढकलल्याने परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. तथापि, विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा उद्देशाने समितीने जाहीर केले, की वर्ग सहावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा नवीन तारखेच्या किमान 15 दिवस आधी कळविले जाईल . 
नवोदय प्रवेश परीक्षा मे 2021 इयत्ता  6 वी प्रशासकीय अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे 




Post a Comment

1 Comments

  1. हॉलतिकीट किती दिवस अगोदर प्राप्त होतं?

    ReplyDelete

तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1