Header Ads Widget

SBI मध्ये 5000 जागांसाठी भरती सुरू शेवटची तारीख 17 मे 2021

SBI मध्ये 5000 जागांसाठी भरती सुरू 

 

 

SOURCE  EASYSHIKSHA

शेवटची तारीख 17 मे 2021 

 

 

                भारतीय स्टेट बँक  जूनियर असोसिएट्सच्या (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) 5 हजार पदांची भरती राबविणार आहे.  भरती एसबीआयच्या देशभरातील शाखांमध्ये केली जाणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरणे सध्या चालू झाले आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2021 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार sbi.co.in bank.sbi/careers या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदाची माहिती खालील प्रमाणे आहे

पात्रता

कोणत्याही विषयातून पदवीधर उमेदवार या पदांवर अर्ज करू शकतात. कोणतीही पदवी असलेला उमेदवार

वयोमर्यादा

 वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे.

निवडप्रक्रिया

जूनियर असोसिएट्स (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) या पदांच्या उमेदवारांच्या निवडीसाठी, ऑनलाईन प्रिलिम्स परीक्षा, ऑनलाइन मुख्य परीक्षा आणि उमेदवारांनी निवडलेली स्थानिक भाषा परीक्षा घेण्यात येईल.


प्रिलिम्स परीक्षा ही 1 तासाची असणार आहे. यामध्ये इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता आणि तर्क क्षमता यांच्याशी संबंधित एकूण 100 प्रश्नं असतील. ही परीक्षा 100 गुणांची असणार आहे, तसेच यामध्ये 0.25 गुणांची निगेटिव्ह मार्कींग देखील असणार आहे. प्रिलिम्स परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे.

अर्ज फी

उमेदवाराला 750 रुपये अर्ज फी भरावी लागेल. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

पगार

निवड झालेल्या उमेदवारांचे वेतन 17 हजार 900 ते 47 हजार 920 रुपये असेल. परंतु सुरुवातीला 19 हजार 900 रुपये मिळेल.

अर्ज कसा करावा ?

इच्छुक आणि पात्र उमेदवार sbi.co.in, bank.sbi/careers या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्याशिवाय खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन उमेदवार सहज अर्ज करू शकतात.,👇👇


                      APPLICATION LINK

ही लिंक मोबाईल वर landscpe म्हणजे आडवा करून पाहता येते

Post a Comment

1 Comments

  1. वरील लिंक ओपन करा व application करा
    https://ibpsonline.ibps.in/sbijascapr21/

    ReplyDelete

तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1