आधार म्हणजे काय ?
युआयडीएआय (“प्राधिकरण”)भारताच्या रहिवाशांना योग्य प्रकारे पडताळणी
प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक १२ अंकी अनियत क्रमांक देते ज्याला आधार
क्रमांक म्हणतात. कोणतेही वय आणि लिंग असणारा भारताचा रहिवासी स्वेच्छेने
आधार क्रमांक मिळवण्यासाठी नावनोंदणी करू शकतो.नावनोंदणी करण्यास इच्छुक
असलेल्या व्यक्तिला नावनोंदणी प्रक्रियेदरम्यान किमान जनसांख्यिक व
जैवसांख्यिक माहिती द्यावी लागते जी पूर्णपणे मोफत आहे. एका व्यक्तिला
आधारसाठी केवळ एकदाच नावनोंदणी करावी लागते व नक्कल हटविल्यानंतर केवळ एकच आधार तयार केला जातो, कारण जनसांख्यिक व जैवसांख्यिक नक्कल हटविण्याच्या प्रक्रियेनंतरच तो विशेष बनतो.
जनसांख्यिक माहिती | नाव, जन्मतारीख(पडताळलेली) किंवा |
जैवसांख्यिकमाहिती | दहा बोटांचे ठसे, |
आधार क्रमांकाची ऑनलाईन पद्धतीने, कमीत कमी खर्चात पडताळणी करता येते. तो विशेष आहे व नक्कल व फसवी ओळख नष्ट करण्याइतका सशक्त आहे व तो विविध सरकारी योजना व कार्यक्रमांची अंमलबाजवणी करण्यासाठी आधार/महत्वाची खूण म्हणून वापरता येऊ शकतो ज्यामुळे सेवा वितरण परिणामकारकपणे होऊन पारदर्शता व सुशासनाला चालना मिळेल. जगभरात अशाप्रकारचा हा एकमेव कार्यक्रम आहे, ज्यामध्ये अद्ययावत डिजिटल व ऑनलाईन ओळख क्रमांक एवढ्या व्यापक प्रमाणात लोकांना मोफत दिला जात आहे, व त्यामध्ये देशभरातील सेवावितरणात अमूलाग्र बदल करण्याची क्षमता आहे.
आधार क्रमांकामध्ये कोणत्याही गोपनीय माहितीचा समावेश होत नाही व त्यामध्ये लोकांची माहिती जात, धर्म, उत्पन्न, आरोग्य व भौगोलिक स्थिती याआधारे नोंदवली जात नाही. आधार क्रमांक ओळखीचा पुरावा आहे, मात्र तो आधार क्रमांकधारकाला कोणत्याही प्रकारे नागरिकत्व किंवा अधिवास देत नाही.
आधार सामाजिक व आर्थिक समावेश, सार्वजनिक क्षेत्रातील वितरणामध्ये सुधारणा, अर्थसंकल्पाचे व्यवस्थापन, सोय वाढवणारे व सहज-सोप्या व लोककेंद्रित प्रशासनाला चालना देणारे महत्वाचे धोरणात्मक साधन आहे. आधार कायमस्वरुपी आर्थिक पत्ता म्हणून वापरता येऊ शकतो व त्यामुळे समाजातील उपेक्षित व दुर्बळ घटकांना मदत होते व म्हणूनच ते सर्वांना न्याय व समानता देणारे साधन आहे. आधार ओळख प्लॅटफॉर्म ‘डिजिटल भारताचा’ आधारस्तंभ आहे, ज्यामध्ये देशाच्या प्रत्येक रहिवाशाला विशेष ओळख दिली जाते.आधार कार्यक्रमाने आतापर्यंत अनेक महत्वाचे टप्पे पार केले आहेतव ती जगातील अशा प्रकारची सर्वात मोठी जैवसांख्यिकीवर आधारित ओळख प्रणाली आहे
आधार ओळख प्लॅटफॉर्ममध्ये विशेषता, आर्थिक पत्ता व ई-केवायसी अशी अंतर्भूत वैशिष्ट्ये आहेत, यामुळे भारत सरकार विविध प्रकारचे अनुदान, लाभ व सेवा देताना केवळ रहिवाशाचा आधार क्रमांक वापरून थेट रहिवाशांपर्यंत पोहोचू शकते.
SOURCE - UIADAI SITE
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS