अर्थ मंत्रालय (Finance Ministry) येत्या 7 जून रोजी (New Income Tax Portal) नवीन इन्कम टॅक्स पोर्टल www.incometax.gov.in खुले करण्यात येणार आहे.
हे नवीन पोर्टल अधिक प्रगत आणि करदात्यांसाठी अधिक सोपे , सुटसुटीत असेल. कर भरणाऱ्या नागरिकांचा त्रास कमी करण्याच्या उद्देशानेच हे पोर्टल तयार करण्यात आलं आहे.
या नवीन पोर्टलची काही वैश्विक
👉 नवीन पोर्टल करदात्यांच्या Income Tax Return प्राप्तिकर विवरणपत्रांवर त्वरित प्रक्रिया PROCESS करू शकते. त्यामुळे करदात्यांना परतावे REFUND लवकरात लवकर मिळतील.
👉-सर्व इंटरअॅक्शन्स, अपलोड किंवा प्रलंबित प्रक्रिया एकाच डॅशबोर्डवर दिसतील, ज्यामुळे करदात्यांना ते व्यवस्थित पूर्ण करता येतील.
👉विनामूल्य ITR preparation software प्रिपरेशन सॉफ्टवेअर () ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध असेल आणि यात इंटरअॅक्टिव प्रश्न असतील जेणेकरुन करदात्यांना सहजपणे त्यांचे आयटीआर दाखल करता येतील. यात आधीच माहिती भरलेली असेल
👉 DATA ENTRY कमी करावी लागेल
👉 डेस्कटॉपवरील पोर्टलची सर्व कार्ये मोबाइल अॅपवरदेखील उपलब्ध असतील, त्यामुळे मोबाइलवर 24 *7 ते वापरण्याची सुविधा मिळेल.
👉नवीन पोर्टलवर नवीन ऑनलाइन कर भरण्याची व्यवस्था असेल
त्यामध्ये पेमेंटचे अनेक नवीन पर्याय दिले जातील. यामध्ये नेटबँकिंग, यूपीआय UPI, क्रेडिट कार्ड CREDIT CARD आणि आरटीजीएस RTGS, एनईएफटी NEFT सारखे पर्याय असतील. करदात्यांना कोणत्याही बँकेतून कर भरता येईल.
👉 आणखीन नवीन माहितीसाठी 7 जून ची प्रतीक्षा करू
तो पर्यंत subsceibe करा आपला , तुमचा आवडता चॅनेल 👇👇👇
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS