Header Ads Widget

JOB UPDATE : एकूण जागा 5159 जागांसाठी IBPS RRB भरती 2021 सुरु #ibpsrecruitment2021




इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS EXAM) मध्ये आरआरबी ऑफिसर्स (स्केल १, २,) आणि ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पस) या पदांवर भरती होणार आहे. आयबीपीएसने यासंदर्भात  सूचना जारी केली आहे. आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येईल. अर्ज प्रक्रिया ८ जून २०२१ पासून सुरु होणार आहे. २८ जून २०२१ ही अर्ज करण्याची अंतिम  तारीख आहे. इच्छुक उमेदवार आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. त्यानंतर, होमपेजमध्ये जाऊन  CRP RRB सेक्शनमध्ये जा. येथे उपलब्ध असलेल्या लिंकवर अर्जाची प्रक्रिया पूर्ण करु शकता. अर्ज करण्यापूर्वी वेबसाईटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचन करावे.
IBPS ने दिलेल्या माहितीनुसार, या पदवीसाठी पहिली परीक्षा ऑगस्ट २०२१ मध्ये होणार आहे. या परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाईल. ऑफिसर्स स्केल १ (पीओ) ची मुख्य परीक्षेसाठी २५ सप्टेंबर २०२१ ला होणार आहे.ऑफिस असिस्टंट (क्लार्क) पदासाठी मुख्य परीक्षेचे आयोजन ३ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात येणार आहे. ऑफिस स्केल २ आणि ३ साठी परीक्षा २५ सप्टेंबर रोजी होणार आहे.
आरआरबी ऑफिसर्स (स्केल १, २,३) आणि ऑफिस असिस्टेंट (मल्टीपर्पस) पदांच्या पदवीसाठी इच्छुक असणाऱ्यांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे. पदानुसार शैक्षणिक योग्यतेची विस्तृत माहिती IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकता. 


IBPS च्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लीक करा 
ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्प्स) पदासाठी वयमर्यादा १८ ते २८ वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.
ऑफिसर स्केल 1 (असिस्टंट मॅनेजर) साठी वय १८ वर्षापेक्षा जास्त आणि ३० वर्षापेक्षा कमी, ऑफिस स्केल 2 (मॅनेजर) २१ वर्षापेक्षा जास्त आणि ३२ वर्षापेक्षा कमी आणि ऑफिस स्केल ३ (सीनियर मॅनेजर) २१ वर्षे ते ४० वर्षांहून कमी वयाचा कालावधी निश्चित केला गेला आहे. १ जून २०२१ नुसार वय मोजणी केली जाईल.

ऑफिसर स्केल १ पदावर अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. (३८७६ पद)



ऑफिसर स्केल २ आणि ३ पदांसाठी अर्जाची लिंक. (१२८३ पद)


वरील माहिती उपयुक्त वाटल्यास कमेंट करून कळवा आणि माझा चॅनेल सबस्क्राईब  करा 
लक्ष्मण ननवरे 
प्राथमिक शिक्षक 
तलासरी , पालघर 
8446699081

Post a Comment

2 Comments

तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1