Header Ads Widget

जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा स्वरूप, महत्त्वाचे मुद्दे , सूचना

नवोदय प्रवेश पूर्व परीक्षा सराव अभ्यासमाला
       
             या अभ्यासमालेचा उद्देश विद्यार्थ्यांचा नवोदय प्रवेश पूर्व परीक्षेचा उत्तम सराव हा  आहे विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकार प्रश्नपत्रिकेचे स्वरूप या विषयाची माहिती व्हावी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने आपण नवोदय प्रवेश पूर्व परीक्षा सराव अभ्यास माला सुरु करीत आहोत. याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय व्हाट्सअप समूह व टेलिग्राम चैनल सुरू करण्यात येईल या समूहात आपण सामील होऊ शकता अथवा टेलिग्राम चैनल सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर युट्युब वरील लाईव्ह क्लासेस सुद्धा जॉईन करू शकता.
             चला तर मग लागुया तयारीला !
       सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा नेमकी कशी असते, त्याच्या मध्ये कोणते विषय असतात याविषयी माहिती.
         या प्रवेश परीक्षेत मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित व भाषा या तीन विषयांची चाचणी घेतली जाते. चाचणीचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
चाचणीचे स्वरूप
         चाचणीसाठी एकच संयुक्त प्रश्नपत्रिका असते चाचणी 100 गुणांची असते चाचणी सोडविण्यासाठी वेळ दोन तास दिलेला असतो
विभाग एक मानसिक क्षमता चाचणी
            नवोदय प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत मानसिक क्षमता चाचणी या विषयात एकूण 40 प्रश्न विचारले जातात या प्रश्नाला पन्नास गुण असतात मानसिक क्षमता चाचणी हा विषय एकूण दहा भागात विभागला आहे या दहा भागात प्रत्येकी चार चार प्रश्न असून 40 प्रश्न विचारले जातात हे प्रश्न केवळ आकृत्यांचे असतात प्रत्येक भागासाठी वेगवेगळ्या सूचना दिलेले असतात या सूचनांचे अवलोकन करणे गरजेचे असते विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमता चे मापन करणे हा या चाचणीचा उद्देश असतो
विभाग दोन अंकगणित
अंकगणित या विभागात प्रश्नपत्रिकेत 20 प्रश्न विचारले जातात या प्रश्नांना 25 गुण असतात या प्रश्नपत्रिकेतील अंकगणित या विषयावर प्रस्तावना उद्देश विद्यार्थ्यांच्या अंकगणितात मूलभूत क्षमता तपासणे हा असतो
विभाग 3 भाषा
जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा विभाग 3 हा भाषा विषय असतो यामध्ये 20 प्रश्न विचारले जातात या प्रश्नांना एकूण 25 गुण असतात भाषा विभागात चार उतारे दिलेले असतात उतारे वाचून व आकलन करून उताऱ्या खालील प्रश्नांची उत्तरे शोधायची असतात प्रत्येक उताऱ्यावर पाच पाच प्रश्न विचारले जातात
महत्त्वाच्या सूचना 
उमेदवारांनी प्रश्न सोडण्यास सुरुवात करण्यापूर्वी चाचणी पुस्तिकेच्या प्रथम पृष्ठावर दिलेल्या सूचना तसेच चाचणीच्या विभागाच्या सुरुवातीला दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचला पाहिजे
         प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी साधारणपणे दीड मिनिट लागेल असे गृहीत धरलेले असते त्यामुळे उमेदवारांनी एकाच प्रश्नासाठी फार वेळ देऊ नये जर एखादा प्रश्न कठीण वाटत असेल तर तो सोडवण्यासाठी वेळ वाया न घालवता त्यापुढच्या प्रश्न सोडवेल सर्व प्रश्न सोडून झाल्यावर न सुटलेले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे वेळ वाचेल
          संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी सलग दोन तास इतका वेळ दिला जाईल
           प्रवेश पात्र ठरण्यासाठी तीन तासांमध्ये स्वतः स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याने एकाच चाचणीवर फार वेळ खर्च न करता एकंदर वेळेची विभागणी स्वतःच्या मर्जीनुसार करण्यास मुभा उमेदवाराला आहे
          योग्य प्रवेश पत्र दाखवल्याशिवाय उमेदवाराला परीक्षागृहात प्रवेश मिळणार नाही
          चाचणी परीक्षा सुरू होऊन तीस मिनिटे झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश मिळणार नाही
          चाचणी परीक्षा सुरू होऊन तीस मिनिटे होईपर्यंत कोणत्याही वेदर आला परीक्षा वर्गातून बाहेर सोडता येणार नाही किंवा बाहेर सोडले जात नाही

Post a Comment

2 Comments

तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1