Header Ads Widget

जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा निवडीच्या आणि प्रवेशाच्या अटी


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा निवडीच्या आणि प्रवेशाच्या अटी

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही एक स्पर्धा परीक्षा आहे ही स्पर्धा परिक्षा संपूर्ण महाराष्ट्रात घेतले जाते या परीक्षेत एकच 100 गुणांची प्रश्नपत्रिका असते यामध्ये मानसिक क्षमता चाचणी अंकगणित भाषा या तीन मुख्य विषयांचा समावेश असतो हे आपणास ज्ञात आहे प्रवेश परीक्षा देण्यापूर्वी परीक्षेच्या संदर्भाने काही मूलभूत अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी बरेचदा आपणास माहित नसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच बरोबर ही परीक्षा तीन विभागात पास होणं अत्यंत महत्त्वाचं सुद्धा आहे तसेच परीक्षा दिल्यानंतर निवड कशी होणार तुमचा प्रवेश निश्चित कसा होईल याच्या साठी कोणते आहेत या विषयाच सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्याचा प्रयत्न करीत आहे
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव अभ्यास माला एक उत्तम उपक्रम असून सर्व विद्यार्थी त्यांनी याचा लाभ घ्यावा व सहभाग नोंदवावा
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच महत्वाच्या निवडीच्या आणि प्रवेशाच्या अटी खालीलप्रमाणे आहेत
निवडीच्या आणि प्रवेशाच्या महत्त्वाच्या अटी
     जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही स्पर्धात्मक परीक्षा आहे
     स्पर्धात्मक परीक्षा असल्यामुळे उमेदवाराला प्रत्येक चाचणीमध्ये उत्तीर्ण व्हावे लागेल तर अधिकाधिक गुण मिळवून गुणवत्ता यादीमध्ये त्याने वरचा क्रमांक पटकावले देखील तेवढेच महत्वाचे आहे .
   प्रवेश परीक्षेत अधिक गुण मिळाले म्हणजे नवोदय विद्यालयात प्रवेश निश्चित असे समजण्यात येऊ नये प्रत्यक्ष प्रवेश घेतेवेळी समितीने ठरवून दिलेली योग्य ती प्रमाणपत्रे सादर केल्यानंतरच प्रवेश मिळू शकेल
       प्रवेश देताना जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी सर्व प्रवाह तपासून खात्री करेपर्यंत जवाहर नवोदय विद्यालयात केले निवड ही तात्पुरती आहे असे समजण्यात येईल
        कोणत्याही तक्रारी च्या बाबतीत जवाहर नवोदय विद्यालय समिती चा निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक असेल
          फक्त निवड झालेल्या उमेदवारांचे निकाल संबंधित जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य जिल्हा शिक्षणाधिकारी क्षत्रिय सल्लागार यांना कळविण्यात येतील
         निवड झालेल्या व न झालेल्या उमेदवारांचे गुण कळविले जात नाहीत तथापि चाचणीच्या निकालाल दूरदर्शन आकाशवाणी व विविध वृत्तपत्रातून प्रसिद्धी दिली जाते कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांची बदली दुसऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात करण्यात येणार नाही
        उत्तरपत्रिकेची फेरतपासणी करण्याची तरतूद नाही निकाल संगणकावर तयार होत असल्याने पुन्हा गुणांची बेरीज तपासण्याची आवश्यकता नसते कारण निकाल तयार करताना त्याची प्रत्येक पायरीला काटेकोरपणे तपासणी करण्याची काळजी घेण्यात येते
        कोणतीही चौकशी करताना उमेदवाराचे नाव क्रमांक याबरोबरच केंद्र क्रमांक गड जिल्हा आणि राज्य ही माहिती दिल्याशिवाय तिची दखल घेतली जाणार नाही
        परीक्षार्थी विद्यार्थी व पालक यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की नवोदय विद्यालयाच्या नियमानुसार आणि राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या दृष्टिकोनातून एका नवोदय विद्यालयातील विद्यार्थी नववीत गेले की त्यांना दुसऱ्या नवोदय विद्यालयात पाठवण्यात येते जर विद्यार्थ्यांनी नकार दिल्यास त्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश दिला जाणार नाही
          अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांची निवड झाल्यास त्यांनी त्यांच्या जातीची प्रमाणपत्रे प्रवेश घेण्याच्या वेळी सादर केले पाहिजेत अशी प्रमाणपत्रे प्रवेश वर्षाच्या 30 मार्च या तारखेपूर्वी सक्षम अधिकाऱ्याकडून मिळवले पाहिजेत म्हणजे ती त्यांना प्रवेश घेण्याच्या वेळी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांना सादर करणे शक्य होईल

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1