Header Ads Widget

विभाग एक मानसिक क्षमता चाचणी नवोदय प्रवेश परीक्षा

नवोदय विद्यालय निवड चाचणी अभ्यासमाला
विभाग 1
मानसिक क्षमता चाचणी
 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अभ्यासमालेत आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आजच्या या लेखांमध् या मानसिक क्षमता चाचणी विभागात विचारले जाणारे प्रश्न चे स्वरूप , कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात , त्याचा उद्देश काय आहे ,किती प्रश्न असतात, एकूण किती गुण असतात या विषयाची माहिती आज आपण करून घेणार आहोत.
विचार व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे भाषा हे आपणास माहीत आहे पण कधी कधी शब्दाने वाक्य वाचून व आकलन आकलन करण्यास विचार करण्यास विद्यार्थ्यांना भाषेचा अडथळा जाणू शकतो त्यामुळे त्यांची विचार करण्याची क्षमता प्रकट होऊ शकत नाही याला पर्याय म्हणजे आकृत्या व चित्रे आकृत्या व चित्रे पाहून विद्यार्थी विचार करू शकतो त्यांना विचार करण्यामध्ये अडथळा येत नाही या मधून सर्व विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता मोजता येणे शक्‍य होते यासाठीच मानसिक क्षमता चाचणी या विषयात फक्त आकृत्या व चित्रे या स्वरूपातील प्रश्न विचारले जातात.
ज्या विषयात प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणाऱ्या मानसिक क्षमता चाचणी तील प्रश्नांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते
एक - या परीक्षेत केवळ आकृती स्वरूपात 40 प्रश्न विचारले जातात या विषयासाठी एकूण 50 गुण असतात प्रत्येक अचूक उत्तरासाठी 1.25 गुण दिला जातो
दोन प्रत्येक प्रश्न मध्ये एक प्रश्न आकृती किंवा प्रश्न आकृत्यांचा संच दिलेला असतो आणि चार संभाव्य उत्तर आकृत्यांचा दुसरा संच असतो त्यातील अचूक उत्तर आकृती शोधायचे असते
तीन संभाव्य उत्तरांच्या चार आकृत्या खाली ए बी सी आणि डी असे पर्याय दिलेले असतात त्यापैकी अचूक पर्यायाचे वर्णाक्षर असलेल्या वर्तुळ उत्तरपत्रिकेत काळे करायचे असते म्हणजेच रंगवायची असते
चार मानसिक क्षमता चाचणी या प्रश्नपत्रिकेत पुढील दहा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात प्रश्नपत्रिकेत या प्रश्न प्रकारांचा क्रम वेगळा वेगळा असू शकतो याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी
             वेगळे पद शोधा जुळणाऱ्या कृती शोधा आकृती पूर्ण करा मालिका पूर्ण करा समसंबंध भौतिक रचना पूर्ण करा आरशातील प्रतिमा घडी घाला व गडी उलगडा अवकाश कल्पना तुकडे जोडा लपलेली आकृती शोधा
असे दहा प्रश्न प्रकार यात समाविष्ट असतात
मानसिक क्षमता चाचणी च्या भरपूर सरावासाठी यावरील प्रत्येक प्रकारचे भरपूर प्रश्न समाविष्ट असलेल्या ऑनलाईन टेस्ट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जातील विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी पालकांनी त्यांना सहकार्य करावे 

चला तर मग लागुया तयारीला 


Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1