सेतू अभ्यासक्रम 2021
Bridge Course 2021
अंमलबजावणी नंतरची विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती तपासणेबाबत
सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत शासनामार्फत या आगोदर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच सेतू अभ्यासक्रम राबवण्यापूर्वी शासनामार्फत एक सर्वेक्षण करण्यात आले होते. केंद्र प्रमुख, विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशीत शिक्षण साधन व्यक्ती तसेच विशेष फिरते शिक्षक यांचेकडून हे सर्वेक्षण यापूर्वी करण्यात आले होते. सेतू अभ्यासक्रम राबवण्यापूर्वी हे झालेले सर्वेक्षण होते. आता सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी झालेली आहे. सेतू अभ्यासक्रमानंतर कोणते बदल झाले. सेतू अभ्यासक्रमाची यशस्वीता तपासण्यासाठी हे सर्वेक्षण परत केंद्र प्रमुख, विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशीत शिक्षण साधन व्यक्ती तसेच विशेष फिरते शिक्षक यांचेकडून केले जाणार आहे. याविषयी सविस्तर माहिती व मार्गदर्शक सूचना .
सेतू अभ्यासक्रम थोडक्यात - About Bridge Course
- 1) इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान, हिंदी व सामाजिक शास्त्रे या विषयांसाठी ४५ दिवसांचा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे.
- 2) सदर सेतू अभ्यासक्रम इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्त्वाच्या क्षमतांवर आधारित आहे. हा अभ्यासक्रम सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी पूर्ण करावयाचा आहे.
- 3) सेतू अभ्यासक्रमामध्ये दिवसनिहाय कृतिपत्रिका (worksheets) देण्यात आल्या असून सदर कृतिपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित, कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत. विद्यार्थी स्वयंअध्ययन करू शकतील असे त्यांचे स्वरूप आहे.
- 4) विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतिपत्रिका शिक्षक / पालक / शिक्षक मित्र / सहाध्यायी / स्वयंसेवक / विद्यार्थी मित्र यांच्या मदतीने सोडवाव्यात. या विषयनिहाय सर्व कृतिपत्रिका विद्यार्थ्यांनी स्वतंत्र वहीमध्ये किंवा शक्य असल्यास त्यांची छपाई (print) करून त्यामध्येही सोडवू शकतात जेणेकरून शिक्षकांना अंतर्गत मूल्यमापनासाठी त्यांचा उपयोग होईल.
- 5) सदर सेतू अभ्यासक्रमामध्ये ठराविक कालावधीनंतर ३ चाचण्या देण्यात आलेल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांनी सोडविणे आवश्यक आहे. शिक्षकांनी या चाचण्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने सोडवून घेऊन त्या तपासाव्यात. या चाचण्यांच्या गुणांची नोंद शिक्षकांनी स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे.
सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी नंतरची विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती तपासणेबाबत....
विषय: सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी नंतरची विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती तपासणेबाबत....
संदर्भ या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशसंप्रम/ संशोधन/सेतू अभ्यासक्रम / २०२१-२२/२०४६, दि.३०/०६/२०२१
उपरोक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते की, परिषदेमार्फत राज्यातील विद्यार्थ्यांचा अध्ययन क्षय भरून काढण्यासाठी सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची परिणामकारकता तपासण्यासाठी संशोधन विभागामार्फत संशोधन हाती घेण्यात आले आहे. याकरिता राज्यातील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याच्या संदर्भात इयत्ता २ री ते ८ वी या इयत्तेतील विद्यार्थ्याची सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी पूर्वीची अध्ययन स्थिती तपासण्यासाठी पूर्व चाचणीद्वारे जुलै २०२१ मध्ये माहिती संकलन करण्यात आले आहे.
त्यानुसार या संशोधनासाठी सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी नंतरची स्थिती तपासणे आवश्यक आहे. यासाठी सर्व्हे मंकी लिंकच्या माध्यमातून उत्तर चाचणी देण्यात येत आहे. आपल्या अधिनस्थ वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, केंद प्रमुख विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशीत शिक्षण साधन व्यक्ती तसेच विशेष फिरते शिक्षक यांच्या सहकार्याने माहिती संकलन करावयाची आहे. यासाठी संबंधितांनी वैयक्तिकरित्या यापूर्वी पूर्व चाचणीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते, त्याच विद्यार्थ्यांचे उत्तर चाचणीसंदर्भातील सर्वेक्षण दि. १५/०९/२०२१ पर्यंत लिंकद्वारे पूर्ण करण्याविषयी अवगत करावे. कोणत्याही परिस्थितीत इतर विद्यार्थ्याची माहिती लिंक वर भरून घेऊ नये. यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना सोबत जोडण्यात आलेल्या आहेत. करिता आपण आपल्या स्तरावरून उपरोक्त संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना यासंदर्भात आदेशित करावे तसेच आपल्या स्तरावर दररोज याचा आढावा घ्यावा. विद्यार्थी सर्वेक्षणाची उपरोक्त लिंक कोणत्याही शिक्षकांना अथवा मुख्याध्यापकांना फॉरवर्ड करण्यात येऊ नये.
मार्गदर्शक सूचना
सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी नंतरची विद्यार्थी अध्ययन स्थिती माहिती संकलन संदर्भातील मार्गदर्शक सूचना
माहिती संकलन साधनाविषयी थोडेसे :
1) इयत्ता २ री ते ८ वी या इयत्तांमधील ज्या विद्यार्थ्यांचा सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी पूर्वीची तपासण्यासाठी समावेश करण्यात आला होता. त्याच विद्यार्थ्यासाठी सदर सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी स्थिती नंतरची अध्ययन स्थिती तपासण्यासाठीचे सर्वेक्षण हाती घेण्यात येत आहे.
2) सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी पूर्वीची स्थिती तपासण्यासाठी देण्यात आलेल्या लिंक प्रमाणेच इयत्तानिहाय सर्व विषयांची एकत्रित प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली असून त्यामध्ये संबंधित इयत्तेतील सर्व विषयावरील प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. (केवळ हिंदी विषय वगळण्यात आलेला आहे. प्रत्येक विषयासाठी साधारणपणे १० प्रश्न विचारण्यात आले आहेत.
3) लिंक जरी एकच असली तरी त्यामध्ये सुरुवातीला एकूण प्रश्न हे सर्व सामान्य असून जी इयत्ता निवडली जाईल त्याप्रमाणे त्या इयत्तेचेच प्रश्न विषय निहाय समोर येणार आहेत. इतर कोणत्याही इयत्तेचे प्रश्न समोर ओपन होणार नाहीत.
4) तसेच प्रत्येक इयत्तेच्या प्रश्नामध्ये शेवटी इंग्रजी विषयाचे प्रश्न देण्यात आले आहेत. इयत्ता २ री ते ७ वीच्या बाबतीत इंग्रजी विषयाचे १० प्रश्न संपल्यानंतर सदर लिंक वर Next असा पर्याय / बटन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर सदर लिंक सबमिट होऊन Thank you for taking the survey असा मेसेज आपल्या मोबाईल स्क्रीनवर दिसून येईल. याचा अर्थ आपली लिंक सबमिट झाली आहे.
सदर प्रश्नपत्रिका सद्यस्थितीत सर्व्हे मंकी लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
माहिती गोळा कशी केली जाईल ?
5) सदर सर्वेक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, विषय सहायक, समावेशीत शिक्षण साधन व्यक्ती व विशेष फिरते शिक्षक, विषय साधन व्यक्ती व केंद्रप्रमुख यांनी या सर्वेक्षणात प्रत्यक्ष विद्यार्थ्याला भेटून त्याची माहिती संकलित करणे अपेक्षित आहे.
6) राज्य स्तरावरून सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी पूर्वीची स्थिती अभ्यासण्यासाठी जुलै २०२१ या महिन्याच्या सुरुवातीस देण्यात आलेल्या लिंकवर वैयक्तिकरित्या इयत्ता २ री ते ८ वी मधील ज्या विद्यार्थ्यांची माहिती भरली होती. त्याच विद्यार्थ्यांची माहिती अंमलबजावणी नंतर देण्यात आलेल्या उत्तर वाचणी सर्वेक्षण लिंक मध्ये भरायची आहे. कोणत्याही परिस्थितीत इतर विद्यार्थ्याची माहिती लिंक वर भरून घेऊ नये.
7) DIET चे प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता व अधिव्याख्याता यांनी आपापल्या संपर्क तालुक्यातील केंद्र प्रमुख, विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशीत शिक्षण साधन व्यक्ती तसेच विशेष फिरते शिक्षक यांचेकडून •विहित कालावधीत दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही पूर्ण करून घ्यावी.
8) यासाठी जिल्हास्तरावरून नियोजन व मार्गदर्शन करणे, वेळोवेळी पाठपुरावा करणे, आढावा घेणे व आवश्यक सपोर्ट देण्यासाठी समन्वय व नियंत्रण करावे. जिल्हातील सर्व सर्वेक्षण हे तटस्थपणे होईल याकडे लक्ष द्यावे.
9) सदर सर्वेक्षण दि. १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होईल याची खबरदारी घ्यावी.
10) सदर विद्यार्थ्याचे सर्वेक्षण हे उपरोक्त निर्देशित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनीच करायचे आहे. विद्यार्थी सर्वेक्षणाची उपरोक्त लिंक कोणत्याही शिक्षकांना अथवा मुख्याध्यापकांना फॉरवर्ड करण्यात येऊ नये. याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. DIET, प्राचार्य व अधिकारी यांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.
अशा प्रकारे मार्गदर्शक सूचनांचे पाल करून हे सर्वेक्षण केंद्र प्रमुख, विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशीत शिक्षण साधन व्यक्ती तसेच विशेष फिरते शिक्षक यांचेकडून केले जाणार आहे. सेतू अभ्यासक्रमाची यशस्वीता पाहणे व इतर माहिती संकलित करणे हा मुख्य हेतू असू शकतो. शिवाय ज्या मुलांचे पूर्वी सर्वेक्षण केले आहे त्यांचेच कदाचित हे सर्वेक्षण केले जावू शकते.
सारांश
अ) इयत्ता २ री ते ८ वी या इयत्तांमधील ज्या विद्यार्थ्यांचा सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी पूर्वीची तपासण्यासाठी समावेश करण्यात आला होता. त्याचीच तपासणी केली जाणार आहे.
आ) केंद्र प्रमुख, विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशीत शिक्षण साधन व्यक्ती तसेच विशेष फिरते शिक्षक यांचेकडून हे सर्वेक्षण केले जाणार आहे.
इ) सर्वेक्षणासाठी एक प्रश्नपत्रिका दिली जाणार आङे त्यानुसार एका लिंकवर ही माहिती भरावयाची आहे.
ई) सर्वेक्षणाची अंतिम दिनांक ही दि. १५ सप्टेंबर २०२१ असणार आहे तो पर्यंत सर्वेक्षण पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
उ) DIET चे प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता व अधिव्याख्याता यांच्यामार्फत सनियंत्रण केले जाणार आहे.
ऊ) सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी पूर्वीची स्थिती तपासण्यासाठी देण्यात आलेल्या लिंक प्रमाणेच इयत्तानिहाय सर्व विषयांची एकत्रित प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली असून त्यामध्ये संबंधित इयत्तेतील सर्व विषयावरील प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.
अशा प्रकारे हे सर्वेक्षण केले जाणार आहे.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS