तलासरी (५ सप्टेंबर)
शिक्षक दिनानिमित्त वडवली पुनर्वसन शाळेत ग्रामस्थांनी उत्साहात कार्यक्रम आयोजित करून सर्व शिक्षकांचा सन्मान केला. सलग तिसऱ्या वर्षी वडवली नवापाड्यातील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शिक्षक दिन मोठ्या आनंदात साजरा केला.
कार्यक्रमात शिक्षकांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शिक्षकांसाठी विविध खेळांचे आयोजन करून त्यांचे मनोरंजन करण्यात आले. यामुळे सर्व शिक्षक भारावून गेले.
गेल्या तीन वर्षांत शिक्षकांनी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी तसेच भौतिक सुविधा उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य कुंदन ठाकरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवानंद ठाकरे, संगीताताई ठाकरे, संतोष ठाकरे, तमन्नाताई ठाकरे, माजी विद्यार्थी, पालक व तरुण मंडळ उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS