1920 ला ’मुकनायक’ हे वृत्तपत्र सुरू करून त्यांनी अस्पृश्यांच्या सामाजिक आणि राजकिय युध्दाला सुरूवात केली.
1920 ला कोल्हापुर संस्थानातील माणगाव येथे झालेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेत त्यांनी सहभाग घेतला.
1924 ला त्यांनी ’बहिष्कृत हितकारणी सभे’ची स्थापना केली. दलित समाजात जागृती पसरवण्याचा या
1927 मधे ’बहिष्कृत भारत’नावाचे पाक्षिक सुरू केले.
1927 ला महाड या गावी चवदार पाण्याकरता सत्याग्रह करून येथील चवदार तलाव अस्पृश्यांना पिण्याकरता खुला करून दिला.
1927 साली जातिव्यवस्थेचा पुरस्कार करणा.या ’मनुस्मृती’ चे त्यांनी दहन केले.
1928 ला गव्हर्नमेंट लाॅ काॅलेज मधे त्यांनी प्राध्यापक म्हणुन काम केले.
1930 साली नाशिक येथील ’काळाराम मंदिरात ’अस्पृश्यांना प्रवेश देण्याकरता त्यांनी सत्याग्रह केला.
1930 ते 1932 या काळात इंग्लंड येथे झालेल्या गोलमेज परिषदेला ते अस्पृश्यांचे प्रतिनीधी बनुन उपस्थित राहिले त्या ठिकाणी त्यांनी अस्पृश्यांकरता स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. 1932 ला इंग्लंड चे पंतप्रधान रॅम्स मॅक्डोनाल्ड यांनी ’जातीय निर्णय’ जाहिर करून आंबेडकरांची मागणी मान्य केली.
जातिय निर्णयाकरता महात्मा गांधीजींचा विरोध होता. स्वतंत्र मतदार संघाच्या निर्मीतीमुळे अस्पृश्य समाज इतर हिंदु समाजापासुन दुर होईल असे त्यांना वाटायचे. म्हणुन जाती निवड तरतुदी विरोधात गांधीजींनी येरवडा (पुणे) जेल मधे प्राणांतिक उपोषणास सुरूवात केली. पुढे त्या अनुषंगाने महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यात 25 डिसेंबर 1932 ला एक करार झाला. हा करार ‘पुणे करार’ या नावाने ओळखला जातो. या करारानुसार डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र मतदार संघाचा हट्ट सोडावा आणि अस्पृश्यांकरता कंपनी कायद्यात आरक्षीत सीट्स असावयास हव्यात असे मान्य झाले.
1935 ला डॉ. आंबेडकरांना मुंबई च्या गव्हर्नमेंट लाॅ काॅलेज येथे शिक्षक म्हणुन निवडले गेले.
1936 ला सामाजिक सुधारणांकरता राजकिय आधार असावयास हवा म्हणुन त्यांनी ’इंडिपेंडंट लेबर पार्टी’ स्थापना केली.
1942 ला ’शेड्युल्ट कास्ट फेडरेशन’ या नावाच्या पक्षाची स्थापना केली.
1942 ते 1946 या काळात त्यांनी गव्हर्नर जनरल यांच्या कार्यकारी मंडळात ’श्रम मंत्री’ बनुन कार्य केले.
1946 ला ’पिपल्स एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणुन काम केले. त्यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेत भारतीय राज्य घटनेचा मसुदा तयार केला. भारतीय राज्य घटना बनविण्यात योगदान दिले म्हणुन’भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार’ या शब्दांनी त्यांचा यथोचित गौरव करण्यात येतो.
स्वातंत्र्या नंतर पहिल्या मंत्री मंडळात त्यांनी कायदे मंत्री म्हणुन कार्य केले.
1956 ला नागपुर येथील ऐतिहासीक कार्यक्रमात आपल्या 5 लाख अनुयायांसोबत त्यांनी बौध्द धर्माची दिक्षा घेतली.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS