Header Ads Widget

सामान्यज्ञान प्रश्नावली GENERAL KNOWLEDGE 1

सामान्यज्ञान प्रश्नावली

GENERAL KNOWLEDGE 


(१) ज्ञानेंद्रिये किती आहेत ?

उत्तर -- पाच


(२) मुख्य दिशा किती ?

उत्तर -- चार


(३) उपदिशा किती ?

उत्तर -- चार


(४) आठवड्याचे वार किती ?

उत्तर -- सात


(५) आपले राष्ट्रगीत कोणते ?

उत्तर -- जनगणमन


(६) आपला राष्ट्रध्वज कोणता ?

उत्तर -- तिरंगा


(७) आपले राष्ट्रीय फूल कोणते ?

उत्तर -- कमळ


(८) आपले राष्ट्रीय फळ कोणते ?

उत्तर -- आंबा


(९) आपला राष्ट्रीय पक्षी कोणता ?

उत्तर -- मोर


(१०) आपला राष्ट्रीय प्राणी कोणता ?

उत्तर -- वाघ


(११) आपला राष्ट्रीय खेळ कोणता ?

उत्तर -- हाॅकी


(१२) इंद्रधनुष्यात किती रंग असतात ?

उत्तर -- सात


(१३) पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ?

उत्तर -- गरूड


(१४) प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात ?

उत्तर -- सिंह


(१५) फुलांचा राजा कोणाला म्हणतात ?

उत्तर -- गुलाब


(१६) एका दिवसाचे किती तास असतात ?

उत्तर -- २४ तास


(१७) एका वर्षात किती महिने असतात ?

उत्तर -- १२


(१८) सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ?

उत्तर -- पूर्व


(१९) सूर्य कोणत्या दिशेला मावळतो ?

उत्तर -- पश्चिम


(२०) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?

उत्तर -- मुंबई


(२१) आपल्या देशाची राजधानी कोणती ?

उत्तर -- दिल्ली


(२३) आकाशाचा रंग कोणता आहे ?

उत्तर -- निळा


(२२) हत्तीच्या नाकाला काय म्हणतात ?

उत्तर -- सोंड


(२३) आईच्या आईला काय म्हणतात ?

उत्तर -- आजी


(२४) महाराष्ट्राचा राज्यफूल कोणता ?

उत्तर -- जारूळ


(२५) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते ?

उत्तर -- कळसूबाई


(२६) महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे ?

उत्तर -- अरबी


(२७) महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत ?

उत्तर -- ३६


(२८) कल्पवृक्ष कोणत्या झाडाला म्हणतात ?

उत्तर -- नारळ ( माड )


(२९) महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता ?

उत्तर -- शेकरू ( मोठी खार )


(३०) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?

उत्तर -- मराठी


(३१) महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर कोणते ?

उत्तर -- नागपूर


(३२) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे ?

उत्तर -- त्र्यंबकेश्वर (नाशिक)


(३३) प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- सातारा


(३४) कच्च्या कैरीचा रंग कोणता ?

उत्तर -- हिरवा


(३५) महाराष्ट्रातील सर्वात लांब धरण कोणते ?

उत्तर -- जायकवाडी


(३६) भारताचे राष्ट्रीय वॄक्ष कोणते ?

उत्तर -- वड


(३७) भारताचे राष्ट्रीय चलन कोणते ?

उत्तर -- रूपया


(३८) महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता ?

उत्तर -- हरियाल


(३९) मोराच्या डोक्यावर काय असते ?

उत्तर -- तुरा


(४०) ग्रहांना प्रकाश कोठून मिळतो ?

उत्तर -- सूर्यापासून


(४१) पृथ्वीचा आकार कसा आहे ?

उत्तर -- गोल


(४२) चंद्राच्या प्रकाशाला काय म्हणतात ?

उत्तर -- चांदणे


(४३) ज्या रात्री चंद्र पूर्ण गोल दिसतो, त्या रात्रीला कोणती रात्र म्हणतात ?

उत्तर -- पौर्णिमेची रात्र


(४४) भारतीय सौर वर्षाचे महिने किती ?

उत्तर -- बारा महिने


(४५) ग्रेगरियन वर्षाचे महिने किती ?

उत्तर -- बारा महिने


(४६) आपण कोणत्या ग्रहावर राहतो ?

उत्तर -- पृथ्वी


(४७) पृथ्वीला प्रकाश कोठून मिळतो ?

उत्तर -- सूर्यापासून


(४८) सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह कोणता ?

उत्तर -- पृथ्वी


(४९) पृथ्वीवर किती टक्के भूभाग आहे ?

उत्तर -- २९ %


(५०) पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापला आहे ?

उत्तर -- ७१ %


(५१) पूर्व दिशेच्या समोर कोणती दिशा येते ?

उत्तर -- पश्चिम


(५२) दक्षिण दिशेच्या समोर कोणती दिशा येते ?

उत्तर -- उत्तर


(५३) सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा कोणती ?

उत्तर -- पूर्व


(५४) सूर्य ज्या दिशेला मावळतो ती दिशा कोणती ?

उत्तर -- पश्चिम


(५५) सूर्योदयापासून सूर्यास्तापर्य॓तच्या काळाला काय म्हणतात ?

उत्तर -- दिन


(५६) सूर्योस्तापासून सूर्यादयापर्यंतच्या काळाला काय म्हणतात ?

उत्तर -- रात्र


(५७) दिन व रात्र मिळून एक पूर्ण काय होतो ?

उत्तर -- पूर्ण दिवस


(५८) इंग्रजी वर्षाप्रमाणे ३१ दिवसांचे महिने किती ?

उत्तर -- सात


(५९) मराठी वर्षांची सुरूवात कोणत्या महिन्याने होते ?

उत्तर -- चैत्र


(६०) आंब्याच्या बीला काय म्हणतात ?

उत्तर -- कोय


(६१) फणसाच्या बीला काय म्हणतात ?

उत्तर -- आठळी


(६२) कापसाच्या बीला काय म्हणतात ?

उत्तर -- सरकी


(६३) चिंचेच्या बीला काय म्हणतात ?

उत्तर -- चिंचोका


(६४) कोणत्या फळापासून आमरस तयार होतो ?

उत्तर -- आंबा


(६५) कोंबड्याच्या डोक्यावर काय असते ?

उत्तर -- तुरा


(६६) चिंचेची चव कशी असते ?

उत्तर -- आंबट


(६७) आवळ्याची चव कशी असते ?

उत्तर -- तुरट


(६८) कारल्याची चव कशी असते ?

उत्तर -- कडू


(६९) मीठाची चव कशी असते ?

उत्तर -- खारट


(७०) साखरेची चव कशी असते ?

उत्तर -- गोड


(७१) पारंब्या कोणत्या झाडाला असतात ?

उत्तर -- वड


(७२) झुरळाला पाय किती असतात ?

उत्तर -- सहा


(७३) पोळा सणाला कोणत्या प्राण्याची पूजा करतात ?

उत्तर -- बैल


(७४) तबेल्यात कोणाला बांधतात ?

उत्तर -- घोडा


(७५) सजीवांचे किती गट आहेत ?

उत्तर -- दोन


(७६) सजीवांचे दोन गट कोणते ?

उत्तर -- प्राणी व वनस्पती


(७७) कोळी किड्याला किती पाय असतात ?

उत्तर -- आठ


(७८) वनस्पतीची मुळे कोठे असतात ?

उत्तर -- जमिनीत


(७९) जिभेचा कोणता रंग चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे ?

उत्तर -- गुलाबी


(८०)श्वसन करताना सजीव कोणता वायू शरीरात घेतात?

उत्तर -- आॅक्सिजन वायू


(८१) मेंदू कोठे असतो ?

उत्तर -- डोक्याच्या कवटीत


(८२) जिल्हयाचा सर्वोच्च अधिकारी कोण असतो ?

उत्तर -- जिल्हा अधिकारी (कलेक्टर )


(८३) भारतीय संविधान केव्हापासून लागू करण्यात आले ?

उत्तर -- २६ जानेवारी १९५०


(८४)भारताचा राष्ट्रीय ध्वजातील तीन रंगाचे पट्टे वरून खाली योग्य क्रमाने कसे येतील?

उत्तर -- केशरी, पांढरा, हिरवा


(८५) नाशिक जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते ?

उत्तर -- साल्हेर


(८६) पन्हाळा गड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- कोल्हापूर


(८७) रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- रायगड


(८८)बालक्रांतीकारक शिरीषकुमार यांचे स्मारक कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- नंदुरबार


(८९) शुन्याचा शोध कोणत्या देशात लागला ?

उत्तर -- भारत


(९०) २६ जानेवारी हा दिवस आपण कोणता दिन म्हणून साजरा करतो ?

उत्तर -- प्रजासत्ताक दिन


(९१) १५ आॅगस्ट हा दिवस आपण कोणता दिन म्हणून साजरा करतो ?

उत्तर -- स्वातंत्र्य दिन


(९२) भारतीय राजमुद्रेखाली कोणते वचन आहे ?

उत्तर -- सत्यमेव जयते.

(९३)समुद्राच्या पाण्याची चव कशी असते ?

उत्तर -- खारट


(९४) ' लाल किल्ला ' कोणत्या शहरात आहे ?

उत्तर -- दिल्ली


(९५) ' ताजमहल ' कोणत्या शहरात आहे ?

उत्तर -- आग्रा


(९६) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- कविता राऊत


(९७) ' मेरी कोम ' कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर -- मुष्टियुध्द


(९८) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

उत्तर -- डाॅ. राजेंद्रप्रसाद


(९९) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?

उत्तर -- जवाहरलाल नेहरू


(१००) भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?

उत्तर -- राकेश शर्मा


(१०१) भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?

उत्तर -- सरदार पटेल


१०२) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी


१०३) तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- नंदुरबार


१०४) सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर -- नर्मदा


(१०५) सर्वात मोठा पक्षी कोणता ?

--- शहामृग


(१०६) सर्वात जास्त बुध्दिमान प्राणी कोणता ?

उत्तर -- मनुष्य


(१०७) घोडे बांधतात त्या जागेस काय म्हणतात ?

उत्तर -- तबेला / पागा


(१०८) चार रस्ते एकत्र येतात, त्या जागेस काय म्हणतात ?

उत्तर - चौक


(१०९) जादुचे खेळ करणा-याला काय म्हणतात ?

उत्तर -- जादूगर


(११०) होडी चालवणा-याला काय म्हणतात ?

उत्तर -- नावाडी / नाखवा


(१११) दगडावर कोरलेल्या लेखास काय म्हणतात ?

उत्तर -- शिलालेख


(११२) डोंगर पोखरून आरपार गेलेल्या रस्त्यास काय म्हणतात ?

उत्तर -- बोगदा


(११३) सापाचा खेळ करून दाखविणा-याला काय म्हणतात ?

उत्तर -- गारूडी


(११४) तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात ?

उत्तर -- सजा


(११५) भारतामध्ये मतदानाचा अधिकार कोणत्या वर्षी

मिळतो ?

उत्तर -- १८ वर्षे पूर्ण


(११६) महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ?

उत्तर -- १ मे १९६०


(११७) महाराष्ट्रात राज्यात एकूण किती जिल्हे आहेत ?

उत्तर -- ३६


(११८) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?

उत्तर -- अरबी


(११९) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?

उत्तर -- मराठी


(१२०) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?

उत्तर -- गंगापूर ( नाशिक )


(१२१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?

उत्तर -- सावित्रीबाई फुले


(१२२) महाराष्ट्राच्या समुद्र किना-याची लांबी किती किलोमीटर आहे ?

उत्तर -- ७२० किलोमीटर


(१२३) समुद्राच्या पाण्यापासून काय तयार करतात ?

उत्तर -- मीठ


(१२४) चंद्र अजिबात दिसत नाही, त्या रात्रीला कोणती रात्र म्हणतात ?

उत्तर -- अमावास्येची रात्र


(१२५ ) विमाने जेथे थांबतात, त्या जागेस काय म्हणतात ?

उत्तर -- विमानतळ


(१२६) एक डझनमध्ये किती वस्तू असतात ?

उत्तर -- १२


(१२७)गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?

उत्तर -- वासरू

      

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1