Header Ads Widget

कृष्णा नदी Krushna River

कृष्णा नदी – Krishna River Information in Marathi
कृष्णा (Krishna) कृष्णा नदी ही महाराष्ट्राची एक महत्त्वाची आणि मोठी नदी आहे. 
 *उगमस्थान* – कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील *महाबळेश्वर* येथे होतो.

 *कृष्णा नदीच्या उपनद्या* – कोयना, वारणा, पंचगंगा, भीमा, येरळा या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. *कृष्णा नदीचे खोरे* – महाराष्ट्रातील *सातारा* आणि *सांगली* हे जिल्हे कृष्णा नदीच्या खोऱ्यात येतात.
 *इतर माहिती* *Other Information* 

 – कृष्णा नदी ही महाराष्ट्रातील मोठी व महत्त्वाची नदी आहे. महाबळेश्वर येथे उगम पावल्यावर सातारा व सांगली जिल्ह्यातून ती वाहत जाते. पुढे कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यातून वाहत ती बंगालच्या उपसागराला मिळते.

प्रारंभी अरुंद असणारी ही नदी वाई या तीर्थक्षेत्राजवळ बरीच रुंद आणि संथ बनली आहे. क-हाड या शहराजवळ कृष्णा व कोयना या नद्यांचा प्रीतिसंगम होतो. पुढे सांगलीजवळ कृष्णा नदीला वारणा नदी मिळते.

तसेच कोल्हापूरजवळून वाहणारी पंचगंगा नदी कृष्णा नदीला नृसिंहवाडीजवळ येऊन मिळते. कृष्णा नदीच्या काठावर वाई, क-हाड, सांगली ही प्रसिद्ध शहरे आहेत. कृष्णा नदीला गावोगावी घाट बांधलेले आहेत.
कृष्णा नदीच्या काठी असणाऱ्या गावांमध्ये अनेक मंदिरे बांधलेली आहेत. कृष्णा नदीमुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील बरीच जमीन सुपीक बनली आहे. या जमिनीत विविध प्रकारची पिके घेतली जातात.

कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांचे पाणी सिंचनासाठी आणि उद्योग-व्यवसाय तसेच पिण्यासाठीही वापरले जाते. कृष्णा नदीमुळे सातारा आणि सांगली तसेच आसपासच्या प्रदेशाची औद्योगिक भरभराट झालेली आहे.

त्यामुळे कृष्णा नदीला साताराआणि सांगली जिल्ह्याची वरदायिनी असे म्हणतात. कृष्णा नदीचे खोरे खूप विस्तृत व सुपीक आहे. सुमारे *२८७००* चौ.कि.मी. क्षेत्रात हे खोरे पसरलेले आहे
. पूर्वेस शंभू महादेवाचे डोंगर व पश्चिमेस सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यानच्या भागात हे विस्तृत खोरे पसरले आहे. कृष्णा नदीच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे कृष्णेच्या खोऱ्यातील जमीन सुपीक व समृद्ध बनली आहे.

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1