Header Ads Widget

ओळखा पाहू मी कोण ?? मराठी कोडे


ओळखा पाहू मी कोण ??
पहचान कौन ??

(१) दिसत नाही कधी कुणाला
पण जाणवतो क्षणाक्षणाला
छातीच्या पिंजऱ्यात लपून असतो
भीती वाटली तर धडधडतो
ओळखा पाहू मी कोण ?
-------------------------------
(२) घर सारविण्यासाठी उपयोग होतो
 माझ्यापासून बायोगॅस तयार होतो
 कुजल्यावर मी खत होतो 
ओळखा पाहू मी कोण ?
-------------------------------------
(३) माझ्यापासून बनवितात स्वेटर 
घोंगडी बनवून वापरतो धनगर
थंडी, वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी माझा वापर
ओळखा पाहू मी कोण ?
--------------------------------------
(४) झाडांना मी आधार देतो
 क्षार व पाणी शोषून घेतो
 त्यांना खोडाकडे मी पाठवितो. 
ओळखा पाहू मी कोण 
-------------------------------------
(५) तऱ्हेतऱ्हेचे रंग मजेचे
वेगवेगळ्या आकाराचे आणि सुगंधाचे 
म्हणून देवालाही आवडतो आम्ही 
फळांना जन्म देतो आम्ही
ओळखा पाहू आम्ही कोण ?
-----------------------------------------









उत्तरे --
 (१) हृदय (२) शेण (३) लोकर (४) झाडाचे मूळ (५) फुले

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1