Header Ads Widget

पसायदान - Pasaydaan Meaning अर्थ

पसायदान । 
 प्रार्थना आणि परिपाठ |
 School Prarthana and Paripath in Marathi
आता विश्वात्मकें देवें। येणे वागयज्ञे तोषावें।
तोषोनि मज द्यावे। पसायदान हे॥१॥

जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो।
भूतां परस्परे जडो मैत्र जिवांचे॥२॥

दुरितांचे तिमिर जातो। विश्व स्वधर्म सूर्ये पाहो।
जो जे वांछील तो ते लाहो। प्राणिजात॥३।।

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी।
अनवरत भूमंडळी। भेटतु भूतां ॥४॥

चला कल्पतरुचें आरव। चेतना चिंतामणीचे गांव।
बोलते जे अर्णव। पियूषांचे ॥५॥

चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन
जे सर्वाही सदा सज्जन। सोयरे होतु ॥६॥

किंबहुना सर्व सुखी। पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदिपुरुखी। अखंडित ॥७॥

आणि ग्रंथोपजीविये। विशेषी लोकीं इये।
दृष्टादृष्ट विजये। होआवे जी॥८॥

तेथे म्हणे श्री विश्वेशरावो । हा होईल दानपसावो।
येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया झाला ।।९।।

ओम शांती शांती शांती।। – संत ज्ञानेश्वर

पसायदानाचा अर्थ
“विश्वस्वरूप सद्गुरु यांनी माझ्या वाग्यज्ञेवरून संतुष्ट होऊन मजला हा प्रसाद द्यावा… दुष्टांचा कुटीलपणा जाऊन त्यांना सत्कर्माची प्रीती उत्पन्न होवो व जीवमात्रांची एकमेकांवर मैत्री वाढो. या सर्व विश्वामधील पापरूपी अंधार नाहीसा होऊन स्वधर्मरूपी सूर्य उगवून त्याचा प्रकाश होवो आणि प्राणिमात्राच्या ज्या ज्या इच्छा असतील त्या त्या पूर्ण होवो.

या भूतलावर अखिल मंगलाचा वर्षाव करणाऱ्या भगवत्भक्तांच्या समुदायाची सर्व भूतांना सद्भावे करून सदोदित भेट होवो…

ते भक्तजन कसे आहेत? चालत- बोलते कल्पतरुचे बाग, जीवंत चिंतामणीचे गांव किंवा अमृताचे चालते- बोलते समुद्रच आहेत… ते कलंकरहित प्रतिचंद्र संसाररूपी अंधःकार दूर करून शांतिसुख देणारे प्रतिसूर्य असे भगवत्भक्त, ते सकल जीवांना प्रिय होवोत…

फार काय मागावे! सर्व त्रैलोक्य सुखाने परिपूर्ण होऊन प्राणिमात्राला हरीचे अखंड भजन करण्याची इच्छा होवो… आणि या ग्रंथावरच ज्यांचे उपजीवन आहे, त्यांना इहलोकचे व परलोकचे भोगावर विजय प्राप्त करो. तेंव्हा सद्गुरु प्रसन्न होऊन म्हणाले की, “तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व होईल.” …असे वरदान मिळाल्याने ज्ञानदेव फार संतोषित झाले.

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1