Header Ads Widget

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन या उपक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत.

प्रति,

प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)

 विषय - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन या उपक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत.
 *संदर्भ* - पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त स्वराज्य सप्ताह अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन कार्यक्रम आयोजित करणेबाबत निर्गमित करण्यात आलेले दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजीचे शासन परिपत्रक

       उपरोक्त संदर्भीय विषयानुसार,  भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राज्यात स्वराज्य महोत्सव चे आयोजन करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.
सदर स्वराज्य महोत्सव  उपक्रमांतर्गत समूह राष्ट्रगीत गायन हा उपक्रम दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता राबवायचा आहे. 
                सदर उपक्रमाच्या यशस्वी
अंमलबजावणीसाठी पुढील सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जावे.
1. दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता एकाच वेळी राज्यात सर्वत्र समूह राष्ट्रगीत गायन होईल, याची दक्षता घेण्यात यावी.
2. या राष्ट्रगीत गायनासाठी राज्यातील शासकीय, खाजगी तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा व शैक्षणिक संस्था यामधील शिक्षक व विद्यार्थी यांचा सहभाग अनिवार्य असेल.
3. सकाळी ठीक 11.00 वाजता समूह राष्ट्रगीताला सुरुवात होईल व सकाळी 11.00 ते 11.01  या एका मिनिटांमध्ये राष्ट्रगीत गायन करणे अपेक्षित आहे, याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.
4. समूह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांमध्ये सर्व स्तरावर जाणीव जागृती निर्माण करण्याची सर्व संबंधितांनी विशेष काळजी घ्यावी.
5. सर्व संबंधित यंत्रणांनी राज्यातील सर्व नागरिकांना दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वाजता आहे त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करण्याचे आवाहन करण्यात यावे.

6. शाळा व शैक्षणिक संस्था येथे या उपक्रमाबाबत सर्व विद्यार्थ्यांना अगोदरच विस्तृत माहिती देण्यात यावी. सर्व सरकारी व खाजगी शाळा,  सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना सदर उपक्रमात सहभागी होणे अनिवार्य राहील.
7. राष्ट्रगीत गायनासाठी विद्यार्थ्यांनी मोकळे पटांगण, वर्ग खोली किंवा हॉल या ठिकाणी एकत्रित उपस्थित राहावे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेणे अनिवार्य राहील.

8. या कार्यक्रमाच्या जाणीव जागृती आणि प्रचार व प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाणात मुद्रित साधने, समाज माध्यमे, खाजगी वाहिन्या, रेडिओ, एफएम रेडिओ, कम्युनिटी रेडिओ इत्यादी माध्यमांचा वापर करावा.
11. स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व  शाळा व पोलीस यंत्रणा अशा सर्व सामान्य नागरिकांच्या दैनंदिन बाबींशी  निगडित यंत्रणांद्वारे समूह राष्ट्रगीत गायन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी या उपक्रमाच्या जाणीव जागृती व प्रसार व प्रचार मध्ये सर्व प्रशासकीय विभागांचे मोठे योगदान राहील, याची सर्व संबंधितांनी खातरजमा करावी.
         उपरोक्त प्रमाणे सर्व सूचनांचे पालन करणे संदर्भात आपले स्तरावरून सर्व शाळा, शैक्षणिक संस्था, क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांना अवगत करण्यात यावे. अधिक माहितीसाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त स्वराज्य सप्ताह अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाबाबतच्या दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजीच्या शासन परिपत्रकाचे अवलोकन करण्यात यावे.

एम. डी. सिंह
 संचालक 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र.

(राज्यातील जास्तीत जास्त शाळा व शिक्षक यांच्यापर्यंत ही पोस्ट शेअर करावी ही विनंती...)


Post a Comment

0 Comments

AISSEE - 2025 Instructions and Procedure for Online Submission of Application Form