Header Ads Widget

5 September teachers day speech in marathi | 5 सप्टेंबर शिक्षक दिन भाषण मराठी |

      5 September teachers day speech in marathi


5 सप्टेंबर शिक्षक दिन भाषण मराठी | 


   आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावर विराजमान झालेले माझे सर्व वंदनीय शिक्षक व पुढे बसलेल्या माझ्या मित्र - मैत्रिनींनो. आज मी तुम्हाला शिक्षक दिनाविषयी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी.



                     गुरुविन न मिळे ज्ञान 

               ज्ञानाविन न होई जगी सन्मान 

                   जीवन भवसागर तराया 

                       चला वंदू गुरुराया...


            मित्रांनो, शिक्षकाचे महत्त्व प्रत्येकाच्या जीवनात असते. आई- वडील आपल्याला जन्म देतात, परंतु शिक्षक आपल्याला जगाची ओळख करून देतात. चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी ते आपल्याला ज्ञानाची आणि संस्काराची शिदोरी देतात. त्या शिदोरीवरच आपण आपल्या आयुष्यात यशाची उत्तुंग शिखरे सहजपणे सर करू शकतो. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते…



 ज्योत पेटवण्यासाठी समईत हवी वात,

         चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात्र, 

                   ध्येय कठीण गाठण्यासाठी, 

                           पाहिजे शिक्षकांची साथ...



मित्रहो, देव आणि गुरु आपल्यासमोर एकत्र आले, तर सर्वप्रथम आपण गुरुंच्या पायांना स्पर्श केला पाहिजे. गुरुंचे महत्त्व आपल्या देवापेक्षाही जास्त आहे. आपण शिक्षकांना आवडेल असे वागले पाहिजे, आपण त्यांचा आदर केला पाहिजे. शिक्षक हा मेणबत्तीसारखा असतो, जो जो स्वतःला पेटवतो आणि विदयार्थ्यांना प्रकाशमान, तेजोमय करतो.


मित्रांनो, या शिक्षक दिनाला आपण सर्वजण एक संकल्प करूया. सर्व शिक्षकांच्या आज्ञेचे आम्ही पालन करू व आजन्म त्यांचा आदर राखू. 

आम्ही असे वर्तन करू की आमच्या वर्तनाने आमच्या शिक्षकांची सदैव ताठ राहील.

Post a Comment

0 Comments

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत मासिक अंशदानाच्या रकमा PRAN खाती जमा करण्याबाबत सुधारीत कार्यपध्दती दि.30/12/2024 चा शासन निर्णय*