Header Ads Widget

समाधान कोळी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

साकळी जि.प.मराठी मुलांच्या शाळेचे शिक्षक समाधान कोळी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
साकळी ता. यावल (वार्ताहर) जळगाव जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा सन २०२२-२३ या वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार साकळी ता. यावल येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेचे  उपशिक्षक समाधान प्रभाकर कोळी (सर) यांना मिळालेला असून आज दि.५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून जळगाव येथे छत्रपती संभाजी महाराज सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.सदर पुरस्कार श्री.कोळी यांनी आपल्या कुटुंबीयांसह स्वीकारला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील, आ.शिरीष चौधरी, आ.राजूमामा भोळे,आ. अनिल पाटील, आ.सुधीर तांबे,जळगावच्या महापौर सौ. जयश्री महाजन,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया,शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्य. शिक्षण अधिकारी बच्छाव साहेब, उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सपकाळे साहेब, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे साहेब यांचेसह अनेक पदाधिकारी व जि.प. प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.श्री.कोळी सर गेल्या पाच वर्षापासून साकळी येथे शाळेत ज्ञानदानाचे कार्य करीत असून त्यांचे अध्यापन अतिशय उत्तम असून ते विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात.शाळेतील सर्व शैक्षणिक कार्यक्रम- उपक्रमांमध्ये त्यांचा हिरहिरीने सहभाग असतो.त्यांच्या या कार्याची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना आदर्श शिक्षक या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
    श्री.कोळी यांना सदरील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे जळगाव जि.प.चे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र (छोटू) सूर्यभान पाटील, यावल पं.स.माजी सभापती सौ. पल्लवीताई चौधरी,उपसभापती दिपक अण्णा पाटील,साकळीच्या सरपंच सौ.सुषमाताई पाटील, डांभुर्णीचे सरपंच पुरुजीत दादा चौधरी,
गटशिक्षणाधिकारी नईम शेख साहेब,विस्तार अधिकारी विश्वनाथ धनके साहेब, माजी गट समन्वयक प्रमोद कोळी, मुलांची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष महाजन,मुलींची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश माळी,दोन्ही समित्यांचे सर्व पदाधिकारी,शिक्षणप्रेमी सदस्य नितीन फन्नाटे,केंद्रप्रमुख किशोर चौधरी (सर),मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मंगला सपकाळे (मॅडम),मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक किशोर साळुंखे (सर) डॉ.सुनील पाटील (साकळी) यांचे सह गावातील विविध पदाधिकारी तसेच दोन्ही शाळांचे सर्व शिक्षक,पालक वर्ग यांनी स्वागत केलेले आहे. श्री.कोळी (सर)यांना शिक्षण क्षेत्रातील अतिशय मानाचा असलेला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने साकळी गावाच्या गौरवशाली शिक्षण क्षेत्रात अजुन एक सुवर्णपान जोडले गेलेले आहे .

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1