महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.६३/सेवा-४
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक: २७.१२.२०२४.
संदर्भ :
१) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक रानियो-२०२२/प्र.क्र.३४/सेवा-४, दि.३१.०३.२०२३.
२) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक रानिप्र-२०२३/प्र.क्र.५७/सेवा-४, दि.२४.०८.२०२३.
शासन परिपत्रक :
संदर्भाधीन क्र.१ च्या शासन निर्णयान्वये परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संदर्भाधीन क्र.२ येथील परिपत्रकान्वये त्याबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे.
२. विविध शासकीय कार्यालयाकडून प्राप्त निवृत्तिवेतन प्रकरणामध्ये काही मुद्दयाच्या अनुषंगाने स्पष्टीकरण करण्याची विनंती महालेखापाल कार्यालयाकडून करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे स्पष्टीकरण सादर करण्यात येत आहे. सर्व विभाग प्रमुख कार्यालय प्रमुखांनी निवृत्तिविषयक प्रस्ताव महालेखापाल कार्यालयाकडे सादर करताना खालील बाबी विचारात घ्याव्यातः-
(१) दि.०१.०४.२०२३ पूर्वी मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांकडून दि.३१.०३.२०२३ रोजी शासन निर्णयासोबत जोडलेल्या नमुना ३ मधील विकल्पाची प्रत तसेच दि.०१.०४.२०२३ रोजी किंवा नंतर मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्याच्याबाबतीत संबंधित कार्यालयाने वित्त विभाग, शासन निर्णय दि.३१.०३.२०२३ अन्वये सादर करण्यात आलेल्या नमुना-२ नमुना-३ कुटुंब निवृत्तिवेतनाच्या प्रस्तावासोबत महालेखापाल कार्यालयाकडे सादर करताना आहरण व संवितरण अधिकारी / सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रमाणित करुन सादर करणे आवश्यक राहील.
(२) दि.३१.०३.२०२३ च्या शासन निर्णयान्वये सानुग्रह अनुदान योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दि.०१.०४.२०२३ पूर्वी मृत्यु पावलेल्या कर्मचाऱ्यांच्याबाबतीत सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे किंवा नाही याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त करुन घेऊन प्रस्तावासोबत महालेखापाल कार्यालयास पाठविणे आवश्यकआहे. तथापि, दि.०१.०४.२०२३ रोजी व त्यानंतर मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर योजना कार्यान्वित नसल्याने त्याबाबतचे प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही.
(३) परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली मधील कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा असलेले कर्मचाऱ्याचे अंशदान व त्यावरील लाभ संबंधितांना देण्यात येऊन शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ संबंधितांना मिळणाऱ्या निवृत्तीविषयक लाभामधून समायोजित करुन शासन खात्यात जमा करण्यात आले आहे असे प्रमाणपत्र सविस्तर लेखाशीर्षासह महालेखापाल कार्यालयाकडे सादर करावे.
यासंदर्भात वित्त विभाग, शासन परिपत्रक दि.२४.०८.२०२३ मध्ये विहित केलेली कार्यपध्दतीचे अनुसरन करावे.
(४) जेथे कायदेशीर वारस / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना NPS/DCPS अंतर्गत जमा झालेला निधी अदा केला गेला नाही, तेथे NPS/DCPS मधील शासनाचे अंशदान आणि त्यावरील व्याज शासन खात्यात भरणा केल्यानंतर निवृत्तिवेतन प्रकरणे महालेखापाल कार्यालयाकडे सादर करताना शासनाचे अंशदान शासन खात्यात जमा केल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
(५) शासन निर्णय दि.३१.०३.२०२३ अनुसार दिनांक ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान अनुज्ञेय करण्यात आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यास जर परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू आहे, तथापि, प्रशासकीय कारणास्तव त्यांचे परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली खाते उघडले गेले नसले तरी सदर कर्मचाऱ्याच्या कुटुंबियास कुटुंब निवृत्तिवेतन व मृत्यु उपदान अनुज्ञेय राहील.
(६) ज्या कर्मचाऱ्यांनी शासन निर्णय, दि.३१.०३.२०२३ प्रमाणे विकल्प दिलेला नसेल. मात्र, त्यांच्या सेवेची १५ वर्ष होण्यापूर्वी किंवा सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून ३ वर्षापर्यंतच्या कालावधीत त्यांचा मृत्यु झाला असेल तर महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील तरतूदीनुसार संबंधित कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन व मृत्यु उपदान मिळण्यास आपोआप पात्र राहतील (default option).
(७) ज्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबामध्ये कुटुंब निवृत्तिवेतनासाठी कोणीही पात्र नसतील तर त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील नियम ११४ व ११५ प्रमाणे पात्र व्यक्तीस मृत्यु उपदान अनुज्ञेय राहतील. तथापि, मृत्यु उपदान प्रदान करताना सानुग्रह अनुदान देण्यात आलेल्या प्रकरणी त्या रक्कमेचे समायोजन केल्यानंतरच संबंधितांना मृत्यु उपदान देय राहील. मात्र अशा प्रकरणी संबंधित कुटुंबियांना शासनाचे अंशदान परत करण्याची आवश्यकता नाही.
(८) राज्य शासनामध्ये २० वर्षाची अर्हताकारी सेवा पूर्ण केल्यानंतर स्वेच्छा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तसेच सक्तीने सेवानिवृत्त व शासनाकडून मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्यात आलेल्याकर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय राहील. तथापि शासन सेवेतून राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय राहणार नाही.
३. जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय विद्यालये तसेच कृषि विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वरील परिपत्रक योग्य त्या फेरफारांसह लागू राहील.
४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२४१२२७१२०५४१५००५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
👉 27/12/2024 चा शासन निर्णय डाउनलोड करा
👉 नवोदय प्रवेश परीक्षा 2025 च्या तयारी साठी जॉईन करा
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS