Header Ads Widget

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना विनम्र अभिवादन...DR. MANMOHAN SINGH

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना विनम्र अभिवादन...



२०१४ मध्ये,आम्ही डॉ.मनमोहन सिंग यांना नीट समजून न घेता चुकीचे निर्णय घेतले.आम्ही मिम्स,खोट्या प्रचाराचा आधार घेत माध्यमांच्या गैरवर्तनामुळे डॉ.मनमोहन सिंग यांच्या कडे कमकुवत पंतप्रधान म्हणून पाहिले गेले.

डॉ.मनमोहन सिंग यांनी शांत अन संयमीपणे आपले कार्य पुर्ण केले,पण आम्हाला आपले योगदान समजण्यात अपयश आले.

डॉ.मनमोहन सिंग यांच्या कर्तृत्वाची काही ठळक वैशिष्ट्ये:

➡️ १९९१ मध्ये उदारीकरणाच्या माध्यमातून भारताला आर्थिक संकटातून वाचवले.

➡️ SEZ धोरण २००५ ने IT आणि आर्थिक क्षेत्रात क्रांती घडवली.

➡️ माहितीचा अधिकार (RTI) २००५ ने पारदर्शकता वाढवली.

➡️ MNREGA २००५ ने ग्रामीण भागातील रोजगाराला चालना दिली.

➡️ भारत-अमेरिका अणुकरार २००८ ने भारताला आण्विक शक्ती म्हणून बळ दिले.

➡️ २०१२ मध्ये भारत पोलीयोमुक्त केला.

➡️ १०.०८% GDP वाढ साधून भारताच्या आर्थिक इतिहासात सर्वोच्च शिखर गाठले.

➡️ जगभरातील आर्थिक मंदीत भारताला सावरण्यासाठी उपाययोजना केल्या.

➡️ २७ कोटी भारतीयांना गरिबीतून बाहेर काढले.

➡️ शिक्षण हक्क कायदा २००९ मुळे शिक्षणाची गॅरंटी दिली.

➡️ भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवली.

पण आम्ही काय केले?
आम्ही आपल्या प्रयत्नांवर दुर्लक्ष केले आणि खोट्या प्रचाराला बळी पडलो.आपल्या कार्याला विसरून,आम्ही चुकीच्या निर्णयांसह सत्ताधाऱ्यांना उंचावलो.

आजच्या स्थितीत,जेव्हा आपला देश सांप्रदायिक वाद, आर्थिक संकट,आणि माध्यमांच्या पक्षपातीपणाने ग्रस्त आहे,तेव्हा आपली आठवण येते.

आम्ही अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या मागे धावलो आणि खोट्या प्रचारामुळे आपली कर्तृत्वे नीट समजू शकलो नाही.

आपली लीडरशिप आणि शांत,संयमी पद्धतीने काम करणे हे खरे नेतृत्व होते,ज्याचा आम्हाला त्यावेळी आदर करता आला नाही.

आता आम्हाला कळले आहे की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या सारख्या संयमी नेत्यांने देशासाठी काय काय केले.त्यांचे नेतृत्व आणि धोरणे आजही भारताचा मजबूत पाया म्हणून कार्य करत आहेत.

डॉ.मनमोहन सिंग यांनी शांतपणे आणि संयमाने देशासाठी कार्य केले,पण आम्हाला ते नीट समजले नाही.

जमाना कर नं सका उनके कद का अंदाजा, 
वह आसमान था मगर सर झुका के चलता था...

अलविदा सिंग साहब ❤️🙏

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना विनम्र अभिवादन....💐💐

Post a Comment

0 Comments

फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी बाबत आजचा महत्वपूर्ण शासन निर्णय, फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी बाबत स्पष्टीकरण - 27 डिसेंबर 2024. FAMILY PENSION GR 27/12/2024

LEARN EXCEL PAGE SETUP - 1