नॅक मानांकित 'अ' श्रेणी
ज्ञानगंगोत्री, मंगापूर धरणाजवळ, गोवर्धণ नाशिक ४२२ २२२ (महाराष्ट्र) भारत
ज्ञानगंगा घरोघरी
संकेतस्थळ Website: www.ycmou.ac.in
NAAC Accredited 'A' Grade
Dnyangangotri, Near Gangapur Dam, Govardhan Nashik-422 222 (Maharashtra) India
https://ycmou.digitaluniversity.ac
ई-मेल E-mail: coe@ycmou.digitaluniversity.ac
इसवनी Telephone: (0253) 2231479
परीक्षा विभाग / Examination Division
जा. क्र : पनिका / हिवाळी परीक्षा 2024/1596
दि.04/12/2024
सूचनापत्र क्र. 08
विद्यार्थी, अभ्यासकेंद्र आणि संमंत्रक यांच्यासाठी महत्वाच्या सूचना ऑनलाईन गृहपाठ सादर करणे (Online Home Assignment Submission)
संदर्भ
: 1. या कार्यालयाचे जा.क्र. 1593 दि.25/11/2024 रोजीचे पत्र.
2. या कार्यालयाचे जा.क्र. 1564 दि.27/09/2024 रोजीचे पत्र.
वरील संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये सर्व शिक्षणक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हस्तलिखित गृहपाठ (Home Assignment) हे ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करण्यासंदर्भात कळविण्यात आले होते. याअनुषंगाने विद्यार्थ्यांनी Home Assignment/ गृहपाठ सादर करण्यासाठी व अभ्यासकेंद्रांना गृहपाठ तपासण्याबाबतची कार्यवाही खालील विहित कालावधीमध्ये पूर्ण करावी.
विद्यार्थी सादर करण्यासाठी व अभ्यासकेंद्रांना गृहपाठ तपासण्यासाठी कालावधी
विद्यार्थ्यांनी गृहपाठ अपलोड करणे.
दि. 15/12/2024
विद्यार्थ्यांनी अपलोड केलेले गृहपाठ अभ्यासकेंद्रांनी पडताळणी करणे.
दि.18/12/2024
समंत्रकांनी गृहपाठ तपासणी करणे.
दि.28/12/2024
विद्यार्थ्यांनी गृहपाठ दिलेल्या मुदतीत https://asm.ycmou.org.in/ या संकेतस्थळावर अपलोड करावयाचे असून अभ्यासकेंद्रांनी आपल्या केंद्रावरील समंत्रकांकडून ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या मुदतीत तपासून पूर्ण करावयाचे आहेत.
तसेच प्रत्येक विभागीय केंद्रांनी आपल्याकडील एका कर्मचाऱ्याकडे या कामाच्या समन्वयाची जबाबदारी सोपवावी, त्यांनी विभागीय केंद्राच्या लॉगीनमध्ये दिलेल्या सांख्यिकीय माहितीनुसार पोर्टलवर किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, किती अभ्यासकेंद्रांनी लॉगीन केले. अभ्यासकेंद्रांनी शिक्षणक्रम संयोजकाने किती विद्यार्थ्यांचे गृहपाठ पडताळणी केली, समंत्रकांनी किती गृहपाठ तपासले याबाबत प्रत्येक दिवशी आढावा घेऊन अभ्यासकेंद्रांशी समन्वय साधावा.
महाराष्ट्र मुक्त A
*
(भटूप्रसाद पाटील) परीक्षा नियंत्रक
नाशिक
उचित कार्यवाहीसाठी
1. सर्व विभागीय केंद्रे अमरावती/छत्रपती संभाजीनगर/मुंबई/नागपूर/नाशिक/पुणे/कोल्हापूर/नांदेड (आपल्या विभागीय केंद्राच्या अधिनस्त असलेल्या अभ्यासकेंद्रांमार्फत विद्यार्थ्यांना या बाबत अवगत करावे.)
2. केंद्रप्रमुख व केंद्र संयोजक,
य.च.म.मु विद्यापीठाचे पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमाचे सर्व अभ्यासकेंद्र.
प्रत माहितीसाठी -
1. मा. कुलगुरू कार्यालय
2. मा.प्र. कुलगुरू कार्यालय
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS