HEADER

बदली अपडेट्स... जिल्हा परिषद शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती बदली पोर्टलवर अद्ययावत करणेबाबत.

क्र. जिपब-११२५/प्र.क्र.१४/आस्था-१४

प्रति,

दिनांक :- ७ जुलै, २०२५

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).

विषय :- जिल्हा परिषद शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती बदली पोर्टलवर अद्ययावत करणेबाबत.



संदर्भ :- मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे यांचे दि.२.७.२०२५ रोजीचे पत्र.

महोदय,

उपरोक्त विषयाबाबत विविध जिल्हा परिषदांकडून शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत भरलेल्या माहितीमध्ये सुधारणा करणे, नावे वगळणे आणि नव्याने नावे समाविष्ठ करण्याबाबत करण्यात आलेल्या विनंतीमुळे व जिल्हा परिषदांकडून करण्यात आलेल्या अशा बदलांमुळे पोर्टलवर भरण्यात आलेली रिक्त पदांची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे.

२. त्यामुळे मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे यांनी संदर्भाधिन पत्रान्वये सूचित केल्यानुसार सर्व जिल्हा परिषदांना खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे,-

१) बदली पोर्टलवरील रिक्त पदांची माहिती अद्ययावत करण्यासाठी ४ दिवसांच्या कालावधीमध्ये बदली पोर्टलवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल.

२) सदर कालावधीमध्ये गट शिक्षणाधिकारी यांनी बदली पोर्टलवरील शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती अद्ययावत करावी.

३) तसेच गट शिक्षणाधिकारी यांनी अद्ययावत केलेल्या माहितीची पडताळणी करुन सदर माहिती शिक्षणाधिकारी यांनी अंतिम करावी.

४) विहीत केलेल्या कालावधीमध्ये कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असून, याकरीता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, याची सर्व जिल्हा परिषदांच्या नोडल अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी.

आपली,

(नीला रानडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :- मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे.

Post a Comment

0 Comments

बदली अपडेट्स... जिल्हा परिषद शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती बदली पोर्टलवर अद्ययावत करणेबाबत.