Header Ads Widget

देशोदेशीचे ज्ञानेश्वर - अणुऊर्जेचा प्रणेता - अल्बर्ट आईनस्टाईन - जगातील किमयागार - भाग ८

देशोदेशीचे ज्ञानेश्वर 

अणुऊर्जेचा प्रणेता - अल्बर्ट आईनस्टाईन

जगातील किमयागार - भाग ८ 

ज्या माणसाने आपल्या आयुष्यात चुका कधीच केल्या नाहीत, त्याने जीवनात काही नविन करण्यासाठी कधीच प्रयत्न केला नाही.


  अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म 14 मार्च , 1879 मध्ये जर्मनी या देशातील उल्म या ठिकाणी झाला . अल्बर्ट आईनस्टाईन यांचे काका इंजिनीअर होते . अल्बर्ट आईनस्टाईन यांना गणित विषयाची आवड निर्माण करण्यामध्ये काकाची खूप मोठी भूमिका होती . वयाच्या 5 व्या वर्षी वडिलांनी अल्बर्टला चुंबकीय कंपास भेट दिले . खऱ्या अर्थाने अल्बर्ट आईनस्टाईन घडण्याचा हा महत्त्वपूर्ण टप्पा होता . अल्बर्ट आईनस्टाईन वयाच्या 12 व्या वर्षी युक्लीड  यांच्या भूमिती विषयक ग्रंथ वाचण्यास मिळाले . या दोन्ही गोष्टीमुळे अल्बर्ट आईनस्टाईन यांनी जगाचा चेहराच बदलला . म्हणूनच अल्बर्ट आईनस्टाईन हे जगातील किमयागार ठरतात .

अल्बर्ट आईनस्टाईन यांनी वयाच्या १६ वर्षी आपले १२ वी चे शिक्षण पूर्ण केल होतं. यानंतर स्वित्झर्लंड च्या ज्युरिच शहरातील फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश घेण्याची त्यांची इच्छा होती.


याकरिता त्यांनी परीक्षा सुद्धा दिली होती परंतु ते त्यात यशस्वी होऊ नाही  शकले.यानंतर त्यांनी आपल्या शिक्षकाच्या सल्ल्यानुसार स्वित्झर्लंडच्या आरौ शहरातील कैनटोनल शाळेत डिप्लोमा केला.

सण १९०० साली अल्बर्ट आईनस्टाईन यांनी स्विज फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून आपल्या पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. त्याच वेळेस त्यांनी स्वित्झर्लंड चे नागरिकत्व स्वीकारले होते. याच्या ५ वर्षानंतर १९०५ साली त्यांनी पी. एच. डी. ची पदवी मिळवली.

अल्बर्ट आईनस्टाईन यांनी पी. एच. डी. ची पदवी ग्रहण केल्यानंतर त्यांची नियुक्ती ज्युरिक विद्यापीठामध्ये प्राध्यापक पदी करण्यात आली होती.

यादरम्यान त्यांनी आपला पहिला क्रांतीकारी विज्ञान संबंधित लेख(डॉक्युमेंट) सुद्धा लिहिला होता.

यानंतर अल्बर्ट आईनस्टाईन यांची नियुक्ती क्ज़ेकोस्लोवाकिया मधील प्राग शहरातील जर्मन विद्यापीठाच्या कुलगुरू पदी करण्यात आली होती. यानंतर ते परत एकदा फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी चे कुलगुरू म्हणून सुद्धा नियुक्त झाले होते.


सण १९१३ साली महान वैज्ञानिक मैक्स फ्लांक आणि वाल्थेर नेर्न्स्ट यांनी अल्बर्ट आईनस्टाईन यांना बर्लिन मधील एका विद्यापीठात करण्यात येणाऱ्या संशोधना करिता आमंत्रित केलं होत. यामुळे ते बर्लिनला गेले होते.

सन १९२० साली त्यांना हॉलंड मधील लंडनच्या विद्यापीठातर्फे आजीवन संशोधन करण्याकरिता आणि व्याख्यान देण्याकरिता प्रस्ताव देण्यात आला होता.

याच ठिकाणी त्यांच्याद्वारे विज्ञान क्षेत्रात अनेक संशोधन करण्यात आले होते. याकरता त्यांना अनेक पुरस्काने सन्मानित देखील करण्यात आले होते.

ज्यावेळेस अल्बर्ट आईनस्टाईन कैलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी सोबत जोडले गेले होते, त्यावेळेला त्यांची कारकीर्द खूप उंच पदावर पोहचली होती.

त्यांनी आपल्या प्रयोगात अनेक आविष्कार करून विज्ञान क्षेत्राला  एक नविन दिशा दिली होती.

अल्बर्ट आईनस्टाईन यांचे संशोधन कार्य –  Researches of Albert  Einstein

प्रकाशाच्या पुंजाचा(क्वांटम) सिद्धांत – QUANTAM THEORY

प्रकाशाच्या पुंजाचा(क्वांटम) सिद्धांतात आईनस्टाईन यांनी उर्जेच्या छोट्या थैली ला फोटोन म्हटलं आणि त्याच्या तरंगाचे वैशिष्ट्य सांगितले. याचबरोबर त्यांनी काही धातूंचे इलेक्ट्रॉनिक उत्सर्जन आणि फोटो इलेक्ट्रिक च्या परिणामाची रचना समजावून सांगितली. याच संशोधनाच्या आधारावर दूरदर्शन चा शोध करण्यात आला होता.


E = Mc2

सण १९०५ साली आईनस्टाईन यांनी वस्तुमान आणि ऊर्जा यांच्यात एक सूत्र बनवलं होत. जे पूर्ण जगात प्रसिद्ध झाल होत.

रेफ्रिजरेटर Invention of Refrigerator

आईनस्टाईन यांनी शीतगृहा चा शोध खूप कमी वेळेत लावला होता. या प्रयोगात त्यांनी अमोनिया, ब्युटेन, पाणी आणि ऊर्जा यांचा जास्तीत जास्त वापर केला होता.

सापेक्षतावादाचा विशिष्ट सिद्धांत –

 आईनस्टाईन यांनी आपल्या या सिद्धांतात वेग आणि वेळ यांचा संबंध समजावून सागण्याचा प्रयत्न केला आहे. सापेक्षतावादाचा विशिष्ट सिद्धांत म्हणतात .

आकाशाचा रंग निळा असतो –

 आईनस्टाईन यांनी प्रकाशाच्या प्रकीर्णान(Scattering Of Light)  बद्दल माहिती सांगितली आहे.

 जेव्हा प्रकाश एखाद्या माध्यमातून प्रवास करत असतो, त्या माध्यमात धुळीचे कण तसेच पदार्थांचे अत्यंत सूक्ष्म कण देखील असतात.यांच्यामुळे प्रकाश सर्व दिशेने प्रकाशित होत जातो. त्याला प्रकाशाचे प्रकीर्णन म्हणतात.

एखाद्या रंगाचे प्रकीर्णन त्याच्या तरंगलांबीवर अवलंबून असते. ज्याप्रमाणे एखाद्या रंगाच्या प्रकाश प्रकीर्णनाची तरंगलांबी कमी असते, त्याच्या रंगाचे प्रकीर्ण सर्वात जास्त आणि ज्या प्रकाशाची तरंगलांबी सर्वात अधिक असते त्या रंगाची प्रकीरणे सर्वात कमी असतात. उदाहरणार्थ आकाशाचा रंग, जो सूर्याच्या प्रकाश किरणांमुळे आपल्याला निळा रंगाचा दिसतो.

याव्यतिरिक्त अल्बर्ट आईनस्टाईन यांनी आपल्या अद्भुत संशोधनातून विज्ञानाच्या विकासाला चालना दिली.

विज्ञान क्षेत्रात दिलेले महत्वपूर्ण योगदान आणि   उत्कृष्ट संशोधन याकरता महान वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

  • सन १९२१ - आईन्स्टाईन यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.

  • सन १९२१ - मत्तयूक्की पदक देण्यात आलं.

  • सन १९२५ -  आईनस्टाईन यांना कोपले पदक देऊन गौरविण्यात आलं होत.

  • सन १९२९ - मैक्स प्लांक पदकाने सुद्धा सन्मानित करण्यात आलं आहे.

  • सन १९९९ - त्यांना शतकातील व्यक्तिमत्व पुरस्कार मिळाला आहे.

विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ म्हणून गणल्या गेलेल्या आइनस्टाइन यांचा वयाच्या ७६ व्या वर्षी दिनांक १८ एप्रिल १९५५ रोजी प्रिन्स्टन येथे मृत्यू झाला.




Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1