Header Ads Widget

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेविषयी माहिती- DETAILED INFORMATION ABOUT JNV EXAM

 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षेविषयी माहिती

1. योजना व व्याप्ती

online क्लासला जॉईन होण्यासाठी 👇👇👇👇

                  स्मार्ट किड्स नवोदय क्लासेस

(1) प्रस्तावना :

शिक्षणाच्या राष्ट्रीय धोरणामध्ये 'सर्वांना समान शैक्षणिक संधी देऊन राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे,' या तत्त्वावर विशेष भर देण्यात आला आहे. या तत्त्वाचा पाठपुरावा करण्यासाठी भारत सरकारने जवाहर नवोदय विद्यालय योजना हाती घेतली आहे. या विद्यालयांतून इयत्ता सहावीमध्ये प्रवेश दिला जातो. या योजनेअंतर्गत मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहयुक्त विद्यालये आहेत. या विद्यालयांमध्ये सर्व विषयांचे शिक्षण, निवास, भोजन, पुस्तके, शिक्षणसाहित्य आणि गणवेश अशा सुविधा विनामूल्य पुरविण्यात येतात. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, नवी दिल्ली या मंडळाच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालान्त परीक्षांपर्यंतची तयारी या विद्यालयांतून करुन घेतली जाते. या विद्यालयांत, शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषा (प्रादेशिक भाषा) हेच ठेवले जाते आणि त्यानंतरच्या इयत्तांमध्ये गणित व विज्ञान हे विषय इंग्रजीतून, तर समाजशास्त्र हा विषय हिंदीतून शिकवला जातो. येथील विद्यार्थी पुढे इयत्ता 10 वी व 12 वीसाठी केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्या परीक्षांना बसतात.

(2) योजनेची उद्दिष्टे :

(अ) शिक्षणाच्या विशेष कार्यक्रमांतून राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे.

(ब) समाजातील - मुख्यत: दुर्बल घटकांतील आणि ग्रामीण विभागांतील - विद्यार्थ्यांची प्रज्ञा जतन करणे.

(क) मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना दर्जेदार शिक्षण देणे.

(ड) परिसरातील इतर संस्थांना प्रेरणादायी, मार्गदर्शक आणि आदर्शवत ठरतील, अशा संस्था जिल्हापातळीवर स्थापन करणे.

(3) व्याप्ती :

संपूर्ण भारतातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक 'जवाहर नवोदय विद्यालय' सुरु करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

योग्य क्षमता असलेले विद्यार्थी मिळाल्यास, प्रत्येक जवाहर नवोदय विद्यालयाच्या सहावीच्या वर्गात जास्तीत जास्त 80 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.

online क्लासला जॉईन होण्यासाठी 👇👇👇👇

                  स्मार्ट किड्स नवोदय क्लासेस

या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 6 वी ते 8 वीपर्यंतचे शिक्षण मोफत असून, इयत्ता 9 वी ते 12 वी या इयत्तांसाठी प्रत्येकी दरमहा रु. 200 फी आहे. मात्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुल्या व राखीव गटांतील सर्व मुली आणि ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न दारिद्र्यरेषेच्या खाली आहे, त्या विद्यार्थ्यांना फी माफ आहे.

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1