महाराष्ट्र दिन हा दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. १ मे १९६० या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून घोषित करण्यात आला. हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून हि साजरा करण्यात येतो. हा दिवस महाराष्ट्रातील सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. विविध कार्यक्रमांचे आयोजन हि या दिवशी केले जाते. १ मे ला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात.
महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?
१९५६ च्या राज्य पुनर्रचना आयोगाच्या नियमानुसार राज्याच्या सीमा ह्या भाषेच्या आधारावर सीमित करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्र समितीकडून मराठी आणि कोंकणी भाषिकांसाठी मुंबईसह वेगळ्या महाराष्ट्राची मागणी करण्यात आली होती, तसेच गुजराती आणि कच्छी भाषिक जनतेसाठी देखील वेगळ्या राज्याची मागणी करण्यात आली. परंतु राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले. या निर्णयावर महाराष्ट्रातील बरीच जनता चिडली होती. अनेक ठिकाणी कामगारांकडून या गोष्टीचा निषेध करण्यात आला. कामगारांचा मोर्चा आणि आंदोलनात पोलिसांचा लाठीचार्च आणि गोळीबार करावा लागला. सयुंक्त महाराष्ट्राच्या या लढ्यामध्ये १०६ आंदोलक बळी पडले.
मराठी माणसाच्या आंदोलनामुळे आणि या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे सरकारने अखेर नमते घेऊन १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना केली. या हुतात्मयांच्या समरणार्थ हा दिवस महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS