BENEFITS OF PPF
P P F चे फायदे कोणते ?
काल आपण PPF विषयी सर्वसाधारण माहिती मिळविली आहे . आज आपण PPF योजना कशी फायद्याची आहे ते जाणून घेवूया .
१ . दीर्घकालीन गुंतवणूक :- या योजनेचा कालावधी १५ वर्षाचा असतो . ७ वर्षाचा लॉक इन असतो म्हणजेच आपणाला ७ वर्ष पैसे काढता येत नाही . दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ण करण्यासठी हि योजना एक उत्तम योजना आहे .
२ . कर सवलत :- या योजनेत कमीत कमी रु ५०० ते रु. १५०,००० वार्षिक एवढी रक्कम आपण गुंतवू शकतो . हि गुंतवणूक आयकर कलम 80 C नुसार करमुक्त असते . ( १५०००० रु. पर्यंत ). म्हणून हि योजना वेगळी ठरते .
३ . निवृत्तीनंतर स्थिरता :- या योजनेतील गुंतवणूक पूर्णपणे करमुक्त असते . त्यामुळे निवृत्तीनंतर करमुक्त उत्पन्न मिळते . आर्थिक स्थिरता मिळते .
४ . गुंतवणूक सुलभता :- हि योजना महिन्याला केवळ ४५ ते ४७ रु भरून सुरु करू शकतो . हि योजना गुंतवणूक करण्याचा सुलभ राजमार्ग ठरतो .
५ . सुरक्षित योजना :- हि योजना सरकार पुरुस्कृत असल्याने गैरव्यवहार , रक्कम बुडणे या गोष्टीची शक्यता नसते . हि एक सर्वसामन्य , नोकरदार यांची आवडती योजना आहे .
६ . व्याज :- हि योजना चक्रवाढ व्याज देते . या योजनेत ७.१ टक्के एवढा सध्या व्याजदर आहे.
७ . खाते :- पीपीएफ खाते राष्ट्रीयकृत बँका,पोस्ट ऑफिस, निवडक खासगी बँका येथे उघडता येते.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS