Header Ads Widget

SCHOLARSHIP EXAMINATION POSTPONED IN MAHARASHTRA - HON. VARSHATAI GAIKAWAD शिष्यवृत्ती परीक्षेविषयी महत्त्वाची घोषणा

 SCHOLARSHIP EXAMINATION POSTPONED IN MAHARASHTRA  

HON. VARSHATAI GAIKAWAD  

शिष्यवृत्ती MAY 2021 परीक्षेविषयी महत्त्वाची घोषणा 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि  इयता आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 23 मे 2021 रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर टाकली आहे. यापूर्वी 25 एप्रिल रोजी होणारी परीक्षा कोरोना विषाणू संसर्गामुळे 23 मे रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी आणि आठवीची माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर टाकल्याची घोषणा केली आहे. राज्य परीक्षा परिषदेने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. (Maharashtra School Education Minister Varsha Gaikwad declared  State Examination Council postpone 5th and 8th standard scholarship exam.)
परीक्षा दोन वेळा  पुढे ....
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनाप्रमाणं इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 25 एप्रिलला 2021रोजी  आयोजित केली जाणार होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शालेय शिक्षण विभागानं 23 मे 2021 ही नवीन तारीख निश्चित केली होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट व त्याचा प्रसार लक्षात घेता  आताही 23 मे ला होणारी परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एकूण 6 लक्ष 32 हजार विद्यार्थी परीक्षेला देणार
राज्यातील 47 हजार 612 शाळांमधील 6 लक्ष 32 हजार 478 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरला आहे. यामध्ये पाचवीच्या वर्गासाठी 3 लक्ष 88 हजार 335 तर आठवीच्या वर्गासाठी 2 लक्ष  44 हजार 143 विद्यार्थ्यांनी आवेदन भरले होते. विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. 





Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1