पॅन कार्ड असे एक कार्ड (PAN Card) आहे, की , ज्यावर लिहिलेल्या नंबरच्यामाध्यातून त्या व्यक्तीची सर्व प्रकारची माहिती काढली जाऊ शकते. ही माहिती इनकम टॅक्स डिपार्टमेंटसाठी (Income tax department)गरजेची असते, हे लक्षात घेऊन इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून प्रत्येक व्यक्तीला पॅनकार्ड जारी केले जाते.
परंतु तुमच्या पॅन कार्डवर PAN CARD वर लिहिलेल्या 10 क्रमांकाचा अर्थ काय? तुम्हाला माहित आहे का?
SURNAME - पॅन कार्ड पाहिले असता त्यावर पॅन धारकाचे नाव , जन्मतारीख व पॅन धारकाच्या वडिलांचे नाव असते .
पॅन कार्डवर 10 अंकी क्रमांक असतो .
पॅन कार्डमधील 10 नंबरपैकी पाचवा अंक तुमचे आडनाव दर्शवतो. इनकम टॅक्स डिपार्टमेंट आपल्या डेटामध्ये फक्त धारकाचे आडनाव ठेवतो. म्हणूनच PAN नंबरमध्ये देखील त्याची माहिती असते. परंतु इनकम टॅक्स डिपार्टमेंट ही माहिती कार्डधारकांना देत नाही
उदाहरण ABCDE2037F या मध्ये E हे अक्षर आडनावासाठी असते .
क्रेडिटकार्ड ते टॅक्स वर नजर ठेवणे
पॅन कार्डसाठी अर्ज केलेल्या व्यक्तींना आयकर विभाग पॅन कार्ड दिले जाते . पॅन कार्ड तयार करताना त्या व्यक्तीचे सर्व व्यवहार पॅन कार्डशी जोडले जतात. कर भरणा , क्रेडिट कार्डद्वारे केलेले सर्व व्यवहार यावर दिसतात
पॅन कार्डमधील 10 अंकी कोडचे पहिले तीन अंक इंग्रजी अक्षरे आहेत. हे AAA आणि ZZZ पर्यंत कोणतेही अक्षरे असू शकतात. ही संख्या डिपार्टमेंट स्वत: हून ठरवते. पॅनकार्ड (PAN Card) क्रमांकाचा चौथा अंकही इंग्रजीतील एक लेटर असते. जे कार्डधारकाचे स्टेटस सांगते.
चौथे लेटर म्हणजे कोणते स्टेटस? ते पाहा
P- सिंगल व्यक्ती
F- फर्म
C- कंपनी
A- AOP (एसोसिएशन ऑफ पर्सन)
T- ट्रस्ट
H- HUF (हिंन्दू एकत्रीत कुटूंब)
B- BOI (बॉडी ऑफ इंडिविजुअल)
L- लोकल
J- आर्टिफिशियल जुडिशियल पर्सन
G- गवर्नमेंट व्यक्ती
आडनावाच्या पहिल्या अक्षरापासून बनवला जातो पाचवा अंक
पॅनकार्ड क्रमांकाचा पाचवा अंकदेखील असाच एक इंग्रजी अक्षर आहे. हा पाचवा अंक पॅन कार्डधारकाच्या (PAN Card) आडनावाचे पहिले अक्षर आहे. या कार्डमध्ये फक्त आडनावच पाहिले जाऊ शकते. यानंतर पॅनकार्डमध्ये 4 नंबर असतात. या संख्या 0001 ते 9999 पर्यंत काहीही असू शकतात.
आपल्या पॅन कार्डची (PAN Card) ही संख्या इनकम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये सध्या सुरू असलेल्या नंबर सिरिजचे प्रतिनिधित्व करते. त्याचा शेवटचा अंक अल्फाबेट चेक अंक आहे, जो कोणत्याही अक्षराचा असू शकतो.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS