Header Ads Widget

प्रॉव्हिडंट फंडाचे प्रकार - TYPES OF PROVIDENT FUND - WHAT IS PPF, EPF AND GPF ? WHAT IS INTEREST RATE ON IT ? GPF, PPF, EPF मध्ये काय फरक आहे ? यांपैकी कोणत्या स्कीमवर किती व्याज मिळते ? सविस्तर वाचाच

प्रॉव्हिडंट फंडाचे प्रकार - TYPES OF PROVIDENT FUND - WHAT IS PPF, EPF AND GPF ? WHAT IS INTEREST RATE ON IT ? GPF, PPF, EPF मध्ये काय फरक आहे ? यांपैकी कोणत्या स्कीमवर किती व्याज मिळते ? सविस्तर वाचाच
            सरकारी,खासगी आणि असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सरकारने त्यांच्या निवृत्ती साठी काही विशेष फंड तयार केलेले आहेत . 
हे विशेष फंड म्हणजे EPF - EMPLOYEE PROVIDENT FUND , GPF - GENERAL PROVIDENT FUND आणि PPF - PUBLIC PROVIDENT FUND .यांच्याविषयी सविस्तर माहिती घेऊया. 
प्रोव्हिडंट फंड म्हणजे रिटायरमेंटची प्लॅनिंग .
सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते खाजगी कर्मचाऱ्यांपर्यंत वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे प्रोव्हिडंट फंड आहेत. दीर्घ गुंतवणूकीसाठी सर्वांत चांगला , उत्तम पर्याय आहे. प्रोव्हिडंट फंड 3 प्रकारचे असतात. 

1 कर्मचारी भविष्य निधी
2 सार्वजनिक भविष्य निधी
3 जनरल  प्रोव्हिडंट फंड


        या खात्यांमध्ये दरमहिना ठरलेली रक्कम जमा केली जाते. तिन्ही फंडच्या व्याजात किती फरक आहे ते पाहू या 


👉 Employees Provident Fund (EPF)

EPF  खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी  असते. यात प्रत्येक कर्माचाऱ्यांचे आपले प्रोव्हिडंट फंडचे खाते असते. EPF मध्ये पगाराच्या 12 टक्के भाग जमा होत असतो. कंपनीच्यातर्फे देखील 12 टक्के भाग जमा केला जातो. EPF वर 8.50 टक्के व्याज मिळते. 
👉Public Provident Fund (PPF)
                        ही सरकारची स्मॉल सेविंग स्कीम आहे. ही योजना इतर लोकांसाठी आहे .यामध्ये खाते उघडून पैसे जमा करता करता येतात. हे खाते  पोस्ट ऑफिस किंवा इतर बँकांमध्ये उघडू शकता. या योजनेत पैसे गुंतवल्याने आयकरातील टॅक्स कपातीत 80 क नुसार  सवलत मिळते. या योजनेवर 7.1 टक्के व्याज मिळते. याचा लॉक इन 15 वर्षे असतो .
👉General Provident Fund (GPF)
 जनरल प्रोव्हिडंट फंड GPF हा  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असतो. हा एकप्रकारे निवृत्ती फंड आहे . त्यांची पूर्ण रक्कम निवृत्ती नंतर मिळते. सरकारी कर्मचारी आपल्या पगाराच्या 15 टक्के  GPF खात्यात जमा करू शकतात. या खात्यावर 7.1 टक्के व्याज दिला जातो. 

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1