YCMOU
ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासंबंधी सूचना
1. आपण आपला ऑनलाईन
प्रवेश अर्ज भरणे सुरु करण्यापूर्वी खाली नमूद केलेली माहिती हाताशी तयार ठेवा.
अ) जात पडताळणी
प्रमाणपत्र मिळाल्याची तारीख / ना-सायस्तर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
ब) अध्यापनातील
अनुभवाचा तपशील - नेमणूक आदेश,
पदवीधर वेतनश्रेणी आदेश.
क) शैक्षणिक तपशील
- डी. एड. / डी. टी .एड./ क्राफ्ट टीचर डिप्लोमा तपशील, पदवी तपशील, पदव्यूत्तर पदवी
तपशील,य.च.म. मुक्त
विद्यापीठातून मिळविलेल्या पदवी,
पदविका, प्रमाणपत्र
इत्यादींचा तपशील.
ड) आपला फोटो आणि
स्वाक्षरी यांच्या स्कॅन कॉपीज.
2. उमेद्वाराने
माहितीपुस्तिकेत दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
3. उमेद्वाराने आपली
वैयक्तिक माहिती, अध्यापनातील
अनुभवाची माहिती, शैक्षणिक
पात्रतेबाबतची माहिती तसेच सामाजिक आरक्षण विषयक माहिती प्रवेश अर्जात भरावयाची
आहे. सोबतच स्वतःचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावयाची आहे.
4. प्रवेश अर्जात
भरलेल्या माहितीची अचूकता उमेदवाराने पडताळून पाहावी. त्यामध्ये काही दुरुस्त्या
करावयाच्या असतील तर त्या प्रवेश अर्ज कन्फर्म करण्यापूर्वी अथवा प्रवेश अर्ज सादर
करण्याच्या मुदतीनंतर दुरुस्त्यांसाठी देण्यात येणाऱ्या विहित कालावधीतच
करावयाच्या आहेत. चुकीची अथवा अपूर्ण माहिती असणारे अर्ज रद्द करण्यात येतील व
पुढील प्रवेश प्रक्रियेत विचारात घेतले जाणार नाहीत.
5. चुका दुरुस्त
करण्यासाठी दिलेल्या मुदतीनंतर उमेद्वारांना प्रवेश अर्जातील माहितीत कोणत्याची
दुरुस्त्या/बदल करता येणार नाहीत.
6. आपला ऑनलाईन प्रवेश
अर्ज भरण्यासाठी स्क्रीनवरील डाव्या बाजूस दिलेल्या "Fill/Edit Application Form" या लिंकवर क्लिक करा.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS