CHARLES ROBERT DARWIN -
चार्लस रॉबर्ट डार्विन
जगातील जगातील किमयागार या लेखमालेत उत्क्रांती वादाचे जनक चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांच्याविषयी आपण माहिती येऊया
सर्व प्राणी एकाच पूर्वजापासून विकसित झालेले आहेत, असा अत्यंत महत्त्वपूर्ण सिद्धांत ज्या थोर व्यक्तीने मांडला त्या व्यक्तीचे नाव आहे चार्ल्स रॉबर्ट डार्विन!
रॉबर्ट डार्विन चा जन्म 12 फेब्रुवारी 1809 मध्ये इंग्लंड या देशात झाला . चार्ज डॉक्टर झाला पाहिजे असे त्याच्या वडिलांना वाटत असे. त्याने यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग येथे प्रवेश घेतला. परंतु त्याचे मन रमेना. समुद्रातील पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यावर संशोधन करणे त्याने पसंत केले. त्याने वनस्पतींचे वर्गीकरण याचा अभ्यास केला. डार्विनचे किड्यांवरील अभ्यासाचे लेख हि प्रसिद्ध झाले. वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक जॉन स्टीवन्स हेन्स्लो आणि इतर निसर्ग तज्ञांशी त्याची घट्ट मैत्री झाली.
रॉबर्ट डार्विनने सजीवांची नैसर्गिक रचना , परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता या विषयावरील विविध पुस्तके अभ्यासली.यामुळे एच.एम.एस बीगल या जहाजावर कप्तान रॉबर्ट फित्झरॉय याचा सहाय्यक म्हणून चार्ल्स ची निवड झाली . दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावर सुमारे पाच वर्षे चाललेल्या या सफरीत चार्ल्सने अनेक नमुने गोळा करून अनेक निरीक्षणे केली.
सजीवांची बाह्यरचना,आंतररचना आणि जीवाश्मविषयक पुरावे याच्या आधारावर त्यानी आपला उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडला.
जो परिस्थितीशी जुळवून घेतो तोच जगण्याच्या स्पर्धेत टिकतो हे तत्त्व त्याने सप्रमाण जगापुढे विशद केले
स्पर्धेत टिकणारे सजीव जेव्हा पुनरुत्पादन करतात तेव्हा नवीन पिढीतही तेच गुणधर्म उतरतात
अशा अत्यंत महत्त्वपूर्ण असा उत्क्रांतीवादाचा जनक डार्विनचे निधन 19 एप्रिल 1882 रोजी झाले.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS