1. विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व)
2. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)
3. प्राचार्य , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
4. शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक (सर्व)
5. शिक्षण निरीक्षक, (मुंबई)
6. प्रशासन अधिकारी, महानगरपालिका (सर्व)
*विषय :* राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रास उपस्थित राहणेबाबत...
*संदर्भ :* शासन निर्णय, दि. २४ सप्टेंबर २०२१.
उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ ते १२ वी व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ च्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी शासनाने अतिरिक्त मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार उपरोक्तप्रमाणे दि.४ ऑक्टोंबर २०२१ पासून शाळा सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
या अनुषंगाने शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासंदर्भात आवश्यक सूचना देण्यासाठी दि.१ ऑक्टोंबर २०२१ रोजी सायं.४.०० वा. ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात मा. प्रा.वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य मार्गदर्शन करणार आहेत. मा. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू , राज्यमंत्री, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांची प्रेरणा या कार्यक्रमाला लाभली आहे. तसेच मा.वंदना कृष्णा, अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व टास्क फोर्समधील मान्यवर डॉक्टर सदस्य व अन्य अधिकारीही या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत. तरी https://youtu.be/0BoKuZ1gu48 या यु-ट्यूब लिंकद्वारे उपरोक्त कार्यालय प्रमुख व त्यांच्या अधिनस्त असणारे क्षेत्रीय अधिकारी , मुख्याध्यापक व शिक्षक यांनी उपस्थित राहावे.
(एम.डी.सिंह)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ३०.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS