Header Ads Widget

SCHOLARSHIP EXAM 2022 INSTRUCTION BY MSCE शिष्यवृत्ती परीक्षा - २०२२ बाबतच्या सूचना

 SCHOLARSHIP EXAM 2022 INSTRUCTION BY MSCE

 शिष्यवृत्ती परीक्षा - २०२२ बाबतच्या सूचना 


           पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) फेब्रूवारी - २०२२ च्या अधिसूचनेस प्रसिध्दी मिळणेबाबत .

महाराष्ट्र शासन 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद 

१७, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे - ०१ Website : www.mscepune.in_Email : mscescholarship@gmail.com दूरध्वनी क्र. ०२०-२६१२३०६६/६७ महत्त्वाचे 

जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/२०२१/३५०३ 

दिनांक :- ०१/१२/२०२१. प्रति, 

मा. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२. विषय :- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) 

फेब्रुवारी - २०२२ च्या अधिसूचनेस प्रसिध्दी मिळणेबाबत... महोदय, 

उपरोक्त विषयानुसार आपणास सविनय सादर करण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. २० फेब्रुवारी, २०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर अधिसूचना या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. कृपया सदर अधिसूचनेस राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरून व दूरध्वनी केंद्रावरून योग्य ती प्रसिध्दी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे. 

सोबत :- अधिसूचना 

आपला विश्वासू, 

(तुकाराम सुपे) 

आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, 

पुणे - ०१. प्रत माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी : 

१. जिल्हा माहिती अधिकारी, पुणे. 

२. शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका. 

३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व. 

४. शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (पश्चिम / दक्षिण / उत्तर). 

५. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सर्व. 

६. प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, सर्व. प्रत माहितीस्तव : 

१. मा. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२. 

२. मा. आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे - ०१.

 ३. मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे - ०१. 

४. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे - ०१. 

५. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग), महाराष्ट्र राज्य. 




Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1