Header Ads Widget

दिनविशेष 11 मार्च

        दिनविशेष 

         11 मार्च 

★ हा या वर्षातील ७० वा (लीप वर्षातील ७१ वा) दिवस आहे.
महत्त्वाच्या घटना
●२०११ : जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.
●२००१ : बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले. या आधी प्रकाश पदुकोण यांनी ते मिळवले होते.
●२००१ : कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारा हरभजनसिंग हा पहिला भारतीय गोलंदाज बनला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.
●१८१८ : इंग्रज फौजांनी पुरंदरला वेढा घातला.

    जन्मदिवस / जयंती

◆१८६३ : सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) – बडोद्याचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक, पडदा पद्धती, बालविवाह, कन्याविक्रय यांना बंदी घालणारे कायदे केले. विधवा विवाहाला संमती दिली 
◆१९८५ : अजंता मेंडिस – श्रीलंकेचा गोलंदाज
◆१९१६ : हॅरॉल्ड विल्सन – इंग्लंडचे पंतप्रधान
◆१९१५ : विजय हजारे – क्रिकेटपटू

      मृत्यू / पुण्यतिथी 
●२००६ : स्लोबोदान मिलोसोव्हिच – सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष 
●१९९३ : शाहू मोडक – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते, 
●१९५५ : अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ 
●१६८९ : छत्रपती संभाजी महाराज

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1