जागतिक महिला दिन
8 मार्च
महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, त्यांचे जीवन सुधारावे यासाठी ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. आज महिला चौकटीबाहेर पडून जगाला गवसणी घालत आहेत. खेळापासून मनोरंजनापर्यंत, राजकारण, लष्कर, संरक्षण मंत्रालयापर्यंत विविध मोठ्या भूमिका त्या बजावत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल आता सर्व पातळीवर घेतली जात आहे. या दिवसाची सुरूवात कशी झाली? यंदाची थीम काय त्याची माहिती असणे गरजेचे आहे.महिला दिन का साजरा केला जातो ? यावर्षीची थीम जाणून घ्या!
महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, त्यांचे जीवन सुधारावे यासाठी ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. आज महिला चौकटीबाहेर पडून जगाला गवसणी घालत आहेत. खेळापासून मनोरंनापर्यंत, राजकारण, लष्कर, संरक्षण मंत्रालयापर्यंत विविध मोठ्या भूमिका त्या बजावत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल आता सर्व पातळीवर घेतली जात आहे. या दिवसाची सुरूवात कशी झाली? यंदाची थीम काय त्याची माहिती असणे गरजेचे आहे.
यंदाची थीम अशी :Theme for Women's day
‘जेंडर इक्वॅलिटी टुडे फॉर अ सस्टेनेबल टुमॉरो’ ही आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२२ ची थीम आहे. याचा अर्थ मजबूत भविष्यासाठी लैंगिक समानता गरजेची आहे. तर या निमित्ताने जांभळा, हिरवा आणि पांढरा असे रंग देण्यात आले आहेत. जांभळा रंग न्याय आणि सन्मानाचे प्रतीक आहे. हिरवा रंग आशेचे प्रतीक आहे आणि पांढरा रंग शुद्धतेचे प्रतीक आहे.हा दिवस साजरा करण्याचे कारण
Why we celebrate Women's Day ?
महिलांवरील भेदभाव संपविण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटावा यासाठीही साजरा केला जातो.
महिला दिनाची सुरूवात कधी झाली ? अमेरिकेमध्ये १९०८ साली कामगार चळवळ झाली. त्यावेळी १५ हजार महिलांनी न्यूयॉर्कमध्ये मोर्चा काढून हक्कांसाठी आवाज उठवला. त्यांनी कामाचे तास कमी करावेत, मतदानाचा अधिकार द्यावा, वेतनश्रेणी वाढवावी अश्या अनेक मागण्या केल्या. त्याची त्याची दखल त्यावेळच्या सरकारने घेतली. १९०९ मध्ये अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने महिला दिन साजरा केला जाणार असल्याची घोषणा केली. तो मोर्चा ८ मार्च रोजी काढण्यात आला होता. त्यानंतर महिला दिनाची सुरूवात झाली.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS