HEADER

शालेय मराठी प्रार्थना - नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा
शालेय मराठी प्रार्थना - नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा
Marathi Prarthana : Namskar maza ya dnyan mandira


नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा

सत्यम शिवम सुंदरा,
सत्यम शिवम सुंदरा ।। धृ.।।   

शब्दरूप शक्ति दे,
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे
चिमणपाखरा, चिमणपाखरा
ज्ञान मंदिरा ...
सत्यम शिवम सुंदरा,
सत्यम शिवम सुंदरा ।।१।। 

विद्याधन दे आम्हांस,
एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतीरी
दयासागरा, दयासागरा
ज्ञान मंदिरा ...
सत्यम शिवम सुंदरा,
सत्यम शिवम सुंदरा ।।२।। 

होऊ आम्ही नीतिमंत,
कलागुणी बुद्धीमंत
कीर्तिचा कळस जाई उंच
अंबरा, उंच अंबरा
ज्ञान मंदिरा ...
सत्यम शिवम सुंदरा,
सत्यम शिवम सुंदरा ।।३।

Post a Comment

0 Comments

गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!