Header Ads Widget

शिक्षकांच्या बदल्या होणार ? वाचा सविस्तर

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये धोरण निश्चित केले आहे. त्यास अनुसरुन सन २०२२ मध्ये जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पध्दतीने करावयाचा निर्णय घेण्यात आलेला आहे .
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करण्याकरिता आपल्या अधिपत्याखालील शिक्षकांचे रोस्टर (बिंदुनामावली) विभागीय आयुक्त, मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदरची बिंदुनामावली अद्ययावत करून ती अपलोड केली नसल्यामुळे सन २०२२ मध्ये करावयाच्या बदल्यांना विलंब होत आहे. सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिता अद्ययावत बिंदुनामावली अपलोड करण्याची दिनांक १७.७.२०२२ पर्यंत मुदत आहे. त्यामुळे या दिनांकापर्यंत बिंदुनामावली www.ott.mahardd.in या संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. सन २०२२-२३ या वर्षातील शिक्षकांच्या बदल्या अद्यापही झाल्या नसल्यामुळे शिक्षकांची अगोदरच नाराजी आहे. तसेच शाळा सुरु झाल्या असल्यामुळे शिक्षकांच्या बदल्यांकरिता आणखी विलंब करणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही. त्यामुळे संदर्भ क्र.२ येथील दिनांक १०.६.२०२२ च्या पत्रातील परिच्छेद २ मधील मुद्दा क्र. ३ मध्ये दिलेल्या सुचनांप्रमाणे दिनांक १७.७.२०२२ पर्यंत जी जिल्हा परिषद कार्यालये बिंदुनामावली अपलोड करणार नाहीत, त्या जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या शुन्य समजून बदल्यांबाबतची कार्यवाही करण्यात येईल अशा जिल्हा परिषदांमध्ये आंतरजिल्हा बदल्यांबाबतच्या दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयातील परिच्छेद २.५ मधील तरतुदीनुसार शिक्षकांची बदली •साखळी पध्दतीने होईल, याची नोंद घ्यावी. अशी कार्यवाही विहित वेळेत पुर्ण न झाल्यामुळे काही न्यायालयीन प्रकरणे उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची राहील. तसेच यापुर्वी संदर्भ क्र. १ येथील २३.६.२०२२ च्या पत्रान्वये दिलेल्या सूचनांप्रमाणे आपल्या जिल्ह्याची अद्ययावत स्वाक्षरीत बिंदुनामावली Vinsys IT Services (I) Pvt. Ltd. यांना दिनांक १७.७.२०२२ पूर्वी उपलब्ध करुन द्यावी.
४. काही जिल्ह्यातील शिक्षकांची माहिती बदली पोर्टलवर अद्ययावत झालेली नसल्याची बाब मे विन्सीस सॉफ्टवेअर कंपनीने शासनाच्या निदर्शनास आणली आहे. तरी अशा शिक्षकांची माहिती संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी बदली पोर्टलवर अद्ययावत करण्याची कार्यवाही कोणत्याही परिस्थितीत दिनांक १७.७.२०२२ पुर्वी करावी.

५. काही शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत मा. न्यायालयाने आदेश दिले असल्यास अशा प्रकरणी मा.न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शासन निर्णय क्रमांक जिपब ४८२०/प्र.क्र.२९०/आस्था.१४, दिनांक ७.४.२०२१ मधील परिच्छेद ५.७ प्रमाणे प्रथम कार्यवाही करावी.


Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1