माहे ऑगस्ट,२०२२ चे माहे सप्टेंबर,२०२-
मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन
गणेशोत्सवापूर्वी प्रदान करणेबाबत.....
महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
झासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण २०२२/प्र.क्र.९८/कोषा-प्रशा ५
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
तारीख: २४ ऑगस्ट, २०२२
वाचा : शासन निर्णय क्रमांक: डिडिओ-१००५/ प्र.क्र.५/कोषा प्रा ५, दि.२९.०८.२००५
शासन परिपत्रक :
गणेशोत्सवाची सुरुवात यावर्षी दि. ३१ ऑगस्ट, २०२२ पासून होत आहे. राज्य शासकीय
अधिकारी/ कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांना गणेशोत्सव सण साजरा करताना आर्थिक अडचणींचा
सामना करावा लागू नये याउद्देशाने माहे ऑगस्ट, २०२२ चे माहे सप्टेंबर, २०२२ मध्ये देय होणारे वेतन /
निवृत्तीवेतन गणेशोत्सव सणापूर्वी प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
र. उपरोक्त संदर्भीय क्र.१ मधील परिच्छेद १(८) मधील तरतूद शिथील करुन असे कळविण्यात येते
की, माहे ऑगस्ट, २०२२ या महिन्याचे वेतन आणि निवृत्तीवेतनाचे प्रदान दि.२९ ऑगस्ट, २०२२ रोजी
करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
३. यादृष्टीने मुंबई वित्तीय नियम , १९५९ मधील नियम ७१ च्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार
नियम, १९६८ च्या खंड १ मधील नियम क्र. ३२८ मधील तरतुदी शिथिल करण्यात येत आहेत.
1. वेतन देयकाचे प्रदान विहित कालावधीत होण्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी
वेतन देयके त्वरीत कोषागारात सादर करावीत.
द. सदर तरतूदी जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषि विद्यापीठे /
कृषि विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी/कर्मचारी, तसेच
निवृतीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांना देखील लागू होतील.
नि संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय तसेच
राज्यातील सर्व कोषागारे व उपकोषागारे यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित कराव्यात.
शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण २०२२/प्र.क्र.९८/कोषा-प्रशा ५
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध
करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२२०८२४१२३२३२०३०५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने
साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(इंद्रजित गोरे)
शासनाचे उपसचिव
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS