🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त कात्राबाद व सोनगिरी येथे शालेय साहित्याचे वाटप.
*मौजे कात्राबाद व सोनगिरी येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला*.
*गावामधून विद्यार्थ्या समवेत गावकऱ्यांनी ही प्रभात फेरी काढून आनंदोत्सव साजरा केला. ग्रामपंचायत कार्यालय येथील झेंडा सेवानिवृत्त सैनिक श्री समाधान देवकर यांच्या हस्ते तसेच प्राथमिक शाळेचा झेंडा शालेय समितीचे अध्यक्ष श्री अमोल गरड यांच्या हस्ते फडकविण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्याबाबत उत्स्फूर्त भाषणे करून गावकऱ्यांची वाहवा मिळविली.*
*भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त कात्राबाद व सोनगिरी येथे गावचे भूमिपुत्र तथा उद्योजक श्री राजाभाऊ शेळके यांच्यातर्फे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर कात्राबाद येथील सेवानिवृत्त सैनिक श्री समाधान देवकर, पैलवान शिवाजी काळे, एस बी कलेक्शन चे प्रमोद बोराडे यांनीही शालेय साहित्य वाटप करून योगदान दिले.*
यावेळी गावच्या सरपंच सौ लक्ष्मिताई कोळी, ग्रा. प. सदस्य गणेश कोकाटे, श्री गोकुळ गरड, विलास गरड, संतोष बोराडे, नितीन शेळके, इर्शाद पटेल, किशोर गरड, तात्या शिंदे, अंगद भोसले, दीपक गरड, अतुल कोकाटे, परसराम कोळी, शाळेचे मुख्याध्यापक अलबते सर, सहशिक्षक श्री रवींद्र कापसे, अंगणवाडी ताई, पोलिस पाटील, आशा स्वयंसेविका तसेच गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.
जि प शाळा कात्राबाद
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS